
गेल्या रविवारपासून यासाठी प्रयत्न सुरु होते. दरम्यान, हिमनदीचे पाणी शिरलेल्या रैणी गावातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे.
चमोली - हिमप्रकोपानंतर तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यापाशी सुरु असलेल्या बचाव कार्याला यश येत असून रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. बोगद्यात सुमारे ३० कामगार अडकल्याची भीती आहे.
जवान अथक बचाव कार्य करीत असून त्यांनी ७५ मिलिमीटर व्यासाचे १२ मीटर लांबीचे भुयार खणले आहे. गेल्या रविवारपासून यासाठी प्रयत्न सुरु होते. दरम्यान, हिमनदीचे पाणी शिरलेल्या रैणी गावातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे (एनटीपीसी) सरव्यवस्थापक आर. पी. अहिरवाल यांनी सांगितले की, बोगद्यातून पाणी किंवा चिखल बाहेर येत नाही, मात्र चिखलामुळे कॅमेरा वापरून शोध घेणे अशक्य ठरले आहे. आतापर्यंत आम्ही ७५ मिलिमीटर व्यासाचा बोगदा खणला असून तो साधारण २५०-३०० मिलिमीटरपर्यंत मोठा करण्याचे काम सुरु आहे.
धौलीगंगा नदीचे पाणी बोगद्यांतून सारखे वाहत असले तरी बेपत्ता असलेल्यांना वाचविता येईल अशी आशा जवानांना अजूनही आहे.
अद्याप बेपत्ता असलेल्यांची संख्या १५८ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नातेवाइकांचा ठिय्या
बोगद्यापाशी बचावकार्य करणारे जवान अहोरात्र सक्रिय आहेत. यानंतरही अद्याप बेपत्ता असलेल्या काही जणांचे नातेवाईक तेथे ठिय्या मांडून आहेत. बचाव कार्य पुरेशा वेगाने होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तेथील पाण्याची पातळी नव्याने वाढल्याचा इशारा अधिकाऱ्यानी दिल्यानंतरही स्थानिकांनी एकत्र येऊन कित्येक तास ठिय्या मांडला. त्यात काही बचावलेल्यांचाही समावेश आहे.