चंडीगडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

चंडीगड : चंडीगडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये एका रिक्षाचालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चंडीगड : चंडीगडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये एका रिक्षाचालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डेहराडूनला राहणाऱ्या या महिलेने काल सायंकाळी स्टेनोग्राफीच्या क्‍लासला जाण्यासाठी सेक्‍टर 37 मधून रिक्षा केली होती. त्या वेळी रिक्षेत आणखी दोन जण आधीच बसले होते. रिक्षाचालकाने या महिलेला मोहाली येथे नेण्याऐवजी सेक्‍टर 53 मधील सुनसान जागेवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. या वेळी तेथून जाणाऱ्या दोन जणांनी ही घटना बघितल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करण्यात येत आहे. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे, असे ते म्हणाले. आरोपींना ओळखण्यासाठी पोलिस रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहेत. त्यामधून रिक्षाचालकाची ओळख झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Chandigarh news Gangs gang rape in Chandigarh