गुरमीतची हनीप्रीत अखेर गजाआड

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पंजाबमध्ये विशेष तपास पथकाकडून अटक

चंडीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमीत राम रहीम सिंग याची दत्तक कन्या हनीप्रीत इन्सानला आज पंजाबमध्ये अटक करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कारप्रकरणी राम रहीमला दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरामध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारास हनीप्रीतने चिथावणी दिली होती, असे चौकशीअंती स्पष्ट झाले होते. मागील महिनाभरापासून पोलिस तिच्या मागावर होते.

हनीप्रीतला झिरकापूर पतियाळा रोडवर अटक करण्यात आली असून, तिला उद्या (ता. 4) रोजी न्यायालयामध्ये सादर केले जाणार आहे. पंचकुलामधील हिंसाचारात हनीप्रीतची नेमकी काय भूमिका होती याचा तपास केला जाणार असून, यासाठी तिला पोलिस कोठडी ठोठावण्यात यावी, अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे करणार आहोत असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. महेशकुमार यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने शरण येण्यापूर्वीच हनीप्रीतला अटक केली. यानंतर पुढील चौकशीसाठी तिला पंचकुलामध्ये आणण्यात आले. तिच्यासोबत असणाऱ्या अन्य एका महिलेसही अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर तिची अटक निश्‍चित मानली जात होती. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी लुकआउट नोटीसही बजावली होती. नेपाळमध्येही तिचा शोध घेतला जात होता.

हनीप्रीतचे दावे

  • माझ्यावरील आरोप निराधार आणि खोटे
  • देशद्रोही ठरविण्यात आल्याने मी तणावाखाली होते
  • एवढ्या मोठ्या समुदायास मी कशी चिथावणी देणार?
  • माझ्याविरोधात कोणाकडेही पुरावे नाहीत
  • मुलगी आणि पित्याचे पवित्र नाते कलंकित करण्यात आले
  • वडील आपल्या मुलीच्या डोक्‍यावर हात ठेवू शकत नाहीत?
  • विश्‍वास गुप्तांच्या आरोपांबाबत मला काही बोलायचे नाही
  • कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्याने मी शरण आले नाही
Web Title: chandigarh news honeypreet insan arrested