Chandigarh University Case: आरोपी विद्यार्थिनीनंतर शिमल्यातून तरुणाला अटक

chandigarh university mms case man arrested from shimla in leaked video case
chandigarh university mms case man arrested from shimla in leaked video case

चंदीगड विद्यापीठातील व्हिडिओ लीक प्रकरणी शिमला येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. यापूर्वी पंजाब पोलिसांनी चंदीगड विद्यापीठाच्या एका विद्यार्थीनीला अटक केली होती. वसतिगृहातील मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून शिमल्यात राहणाऱ्या तिच्या प्रियकराला पाठवल्याचा आरोप तरुणीवर आहे. मात्र, पोलिस आणि विद्यापीठाने हा दावा फेटाळून लावला होता. युनिव्हर्सिटीच्या प्रो-चान्सलरनी सांगितले होते की, आरोपी विद्यार्थिनीने फक्त स्वतःचे व्हिडीओ काढून पाठवला होता. दरम्यान या प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ माजली असून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी शिमला येथून अटक करण्यात आलेल्या 23 वर्षीय व्यक्तीचे नाव सनी मेहता असे असून तो शिमल्याच्या रोहरू येथील रहिवासी आहे. दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेली महिला विद्यार्थिनीही मूळची रोहरू येथील आहे.

दरम्यान आरोपी तरुणाच्या शोधात पंजाब पोलीस शिमल्यात पोहोचले होते. तरुणीने तिच्या मोबाईलमधील आरोपी तरुणाचा फोटोही दाखवला होता. पंजाब पोलिसांनी सांगितले होते, ती मुलगी शिमल्यात राहणाऱ्या आरोपी तरुणाला ओळखत होती. विद्यार्थ्याच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर उर्वरित माहिती बाहेर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

chandigarh university mms case man arrested from shimla in leaked video case
राहुल गांधींची चिमुरडीला चप्पल घालायला मदत, भारत जोडो यात्रेचा Video Viral

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार रंजीत रंजन यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त करत पंजाब सरकारला घेरले. मुख्यमंत्र्यांनी चंदीगड कॅम्पसला भेट देऊन त्याचा संपूर्ण आढावा घ्यावा, असे ते म्हणाले आहेत. ते फक्त ट्विट करून प्रकरणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ही अत्यंत संवेदनशील बाब असून त्यावर कठोर कारवाईची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते म्हणाले, ट्विटर-ट्विटर खेळण्याची ही वेळ नाही. हा विषय विद्यार्थ्यांशी निगडित आणि अत्यंत गंभीर बाब आहे. एकीकडे उच्चस्तरीय चौकशीची चर्चा आहे तर दुसरीकडे विद्यापीठाचे प्रो-व्हाइस चान्सलर काहीही झाले नसल्याचे सांगत आहेत. ही चौकशी अशी कशी होईल? विद्यापीठातील विद्यार्थी अजूनही कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यापीठात दोन दिवस वर्ग बंद राहणार आहेत.

chandigarh university mms case man arrested from shimla in leaked video case
Chandigarh University : विद्यापीठ म्हणतं असं काही घडलंच नाही, जाणून घ्या प्रकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com