चंद्रग्रहण 2021: 580 वर्षानंतर येणार असा योग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रग्रहण 2021: 580 वर्षानंतर येणार असा योग
चंद्रग्रहण 2021: 580 वर्षानंतर येणार असा योग

चंद्रग्रहण 2021: 580 वर्षानंतर येणार असा योग

sakal_logo
By
टीम ई सकाळ

धर्म आणि विज्ञानासाठी चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहण हे महत्वाचे मानले जाते. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत असतो. ज्योतिषी आणि खगोलशास्त्रज्ञ यांच्यानुसार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण शुक्रवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे. जरी हे आंशिक आणि उपछाया चंद्रग्रहण असले तरी ते सर्वात जास्त काळ चालणाऱ्या चंद्रग्रहणांपैकी एक असल्याचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात. अशाप्रकारचे ग्रहण 580 वर्षानंतर आले आहे. याचे महत्व जाणून घेऊया.

हेही वाचा: चेतना तरंग : खोटे बोलणारा निष्पाप असतो

1) 19 नोव्हेंबरला शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा असल्याने या दिवसाचे महत्व मोठे आहे.

2) खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे शतकातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या चंद्रग्रहणांपैकी एक आहे. हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार,19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:34 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5:33 वाजता संपेल. त्यामुळे ग्रहणाचा कालावधी 3 तास 26 मिनिटे असेल. तर पेनम्ब्रल चंद्रग्रहणाचा कालावधी 5 तास 59 मिनिटे असेल.

3)अशाप्रकारे मोठा कालावधी असणारे ग्रहण यापूर्वी 580 वर्षांपूर्वी 18 फेब्रुवारी 1440 रोजी झाले होते असे तज्ञांचे मत आहे.

4) पृथ्वी आणि चंद्रामधले अंतर जास्त आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा कालावधी इतका मोठा असण्याचे कारण सांगितले जात आहे.

5) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होत असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याचे ज्योतिषी सांगतात.

6) हे आंशिक आणि उपछाया चंद्रग्रहण असल्याने त्याचा प्रभाव मर्यादित आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध ठरणार नाही.

loading image
go to top