चंद्राबाबूंचा 'एनडीए'तून बाहेर पडण्याचा निर्णय दुर्दैवी : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडले. त्यांच्या या घोषणेनंतर अमित शहा यांनी चंद्राबाबूंना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले, की तेलुगू देसम पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला, त्यांचा हा निर्णय दुर्दैवी आणि एकतर्फी आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मी अत्यंत भयभीत झालो.

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चंद्राबाबूंना एक पत्र लिहिले. या पत्रात अमित शहा यांनी सांगितले, की पक्षाने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आणि एकतर्फी आहे. 

आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी टीडीपीने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर त्यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी एनडीएला बाहेरून पाठिंबा देण्याची सहमती दर्शवली होती. त्यानुसार मोदी सरकारमधील नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू आणि केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे दिले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच टीडीपीने एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. 

chandrababu

चंद्राबाबू नायडू एनडीएतून बाहेर पडले. त्यांच्या या घोषणेनंतर अमित शहा यांनी चंद्राबाबूंना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले, की तेलुगू देसम पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला, त्यांचा हा निर्णय दुर्दैवी आणि एकतर्फी आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मी अत्यंत भयभीत झालो.

तसेच या पत्रात अमित शहा यांनी भाजपने केलेल्या सहकार्याची माहिती दिली. लोकसभा आणि राज्यसभेत तुमच्या पक्षाचे जेव्हा पुरेसे प्रतिनिधित्व नव्हते, त्यावेळी भाजपने यासाठी अजेंडा निश्चित केला आणि तेलुगू जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Chandrababu decision is both unfortunate as well as unilateral says BJP Amit Shah