चंद्रबाबूंच्या मुलाचा आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात समावेश

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव नारा लोकेश यांचा समावेश करण्यात आला आहे. नारा लोकेश यांनी आज (रविवार) मंत्रिपदाची शपथ घेतली. 

सध्या तेलुगू देसम पक्षाचे विद्यमान सरचिटणीस असलेले 34 वर्षीय लोकेश हे स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलचे पदवीधर आहेत. त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. शपथविधीनंतर लोकेश यांनी चंद्राबाबू यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. 

चंद्राबाबू यांनी 2014 पासून पहिल्यांदाच त्यांच्या मंत्रिमंडळात बदल केला आहे. आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून लोकेश यांनी 30 मार्च रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येईल असे संकेतही त्यांनी एका तेलुगू वृत्तवाहिनीशी बोलताना दिले होते. 
 
Web Title: chandrababu inducts son nara lokesh in state cabinet