पंतप्रधान मोदींकडून देशाची दिशाभूल : नायडू

यूएनआय
रविवार, 22 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, की केंद्राने आम्हाला 18 आश्‍वासने दिली होती. विशेष राज्याचा दर्जा देण्याचे हे पहिले आश्‍वासन होते. मात्र, ते पाळले गेले नसल्याचे नायडू म्हणाले. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आपल्याला भेटले तरी आपण एनडीएमध्ये जाणार नाही, अशी स्पष्टोक्तीही नायडू यांनी केली. कालचा अविश्‍वास ठराव हा नैतिक विरुद्ध संख्या यांच्यातील युद्ध होते, असेही ते म्हणाले. 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, की केंद्राने आम्हाला 18 आश्‍वासने दिली होती. विशेष राज्याचा दर्जा देण्याचे हे पहिले आश्‍वासन होते. मात्र, ते पाळले गेले नसल्याचे नायडू म्हणाले. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आपल्याला भेटले तरी आपण एनडीएमध्ये जाणार नाही, अशी स्पष्टोक्तीही नायडू यांनी केली. कालचा अविश्‍वास ठराव हा नैतिक विरुद्ध संख्या यांच्यातील युद्ध होते, असेही ते म्हणाले. 

लोकसभेत काल विरोधकांकडून मांडण्यात अविश्‍वास ठरावादरम्यान विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रच्या विशेष दर्जा देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. कालच्या भाषणात मोदी यांनी, कॉंग्रेसने चुकीच्या पद्धतीने आंध्र प्रदेशचे विभाजन केल्याचे म्हटले होते. कॉंग्रेसमुळे तेलंगणात वाद वाढले आहेत. एनडीए सरकार आंध्रच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षाचा सन्मान करते. मात्र, त्याच वेळी केंद्र सरकार चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीला बांधिल असल्याचे मोदी म्हणाले. विशेष राज्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात, तेवढेच पॅकेज आंध्रला दिले.

केंद्र सरकार आंध्रच्या विकासासाठी बांधिल असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर टीका करताना नायडू म्हणाले, की, आंध्रला विशेष दर्जांतर्गत देण्यात येणारे पॅकेज का नाकारले, अशी विचारणा केली असता, त्यांनी वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशी आणि मर्यादेचे कारण सांगितले. अहवालातील मर्यादा काय आहेत? हे आम्हाला सांगितले नाही. ते अगोदर स्पष्ट करा. राज्य फेररचना कायद्याची अंमलबजावणी करताना मुलाला वाचवण्यासाठी आईला मारले, असे मोदी म्हणाले. परंतु, आईसाठी काहीतरी करा, असे आवाहन नायडू यांनी केले.

Web Title: Chandrababu Naidu Says PM Is Misleading the Nation