चंद्राबाबू आता नोटाबंदी विरोधाच्या पवित्र्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

विजयवाडा - केंद्राने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे जोरदार समर्थन करणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहेत. नोटाबंदीचा निर्णयाला 40 पेक्षा अधिक दिवस झाले असले तरी अद्यापही अडचणींमध्ये वाढ होत असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर असे काही होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, अशी टीका चंद्राबाबू नायडू यांनी आज केली.

तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदार आणि आमदारांच्या कार्यशाळेत बोलताना नायडू म्हणाले की, टीडीपीत 1984 मध्ये झालेले पक्षांतर्गत बंड 30 दिवसांत शमविण्यात यश आले होते. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाला 40 पेक्षा अधिक काळ होऊनही या निर्णयामुळे तयार झालेल्या अडचणींवर उपाय शोधण्यात यश आलेले नाही.

नोटाबंदीचा निर्णय घ्यावा अशी आमची मागणी नव्हती. मात्र, त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी संपताना दिसत नाहीत. चाळीस दिवसांनंतरही नागरिकांना दिलासा देण्यात सराकरला यश आलेले नाही, असे नायडू म्हणाले. दर दिवशी मी माझे दोन तास खर्च करतो आहे; मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे तयार झालेल्या अडचणींवर उपाय शोधण्यात यश मिळालेले नाही.

केंद्राने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे नायडूंनी जोरदार समर्थन केले होते. तसेच, या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही त्यांच्या पक्षाकडून करण्यात आला. मोठ्या किमतीच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र नायडू यांनी 12 ऑक्‍टोबर रोजीच पंतप्रधानांना लिहिले होते, असे टीडीपीकडून सांगण्यात येत होते. आता मात्र नोटाबंदीच्या निर्णयासाठी बॅंकांची तयारी नव्हती असे सांगत नायडू हे विरोधाचा सूर लावताना दिसत आहेत.

Web Title: chandrababu to oppsoe note ban