चांद्रयानाची नासाच्या यानाशी टक्कर टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांद्रयानाची नासाच्या यानाशी टक्कर टळली
चांद्रयानाची नासाच्या यानाशी टक्कर टळली

चांद्रयानाची नासाच्या यानाशी टक्कर टळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारताच्या चांद्रयान-२ ची अमेरिकेच्या ‘एलआरओ’ या यानाशी अवकाशात होणारी टक्कर टळली, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने दिली. यावर्षी २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ हा अंतराळातील अपघात टळला, असेही इस्रोने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

या घटनेपूर्वी आठवडाभर आधी इस्रो व अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने यासंदर्भात विश्वेषण केले. त्यानुसार, दोन्ही यानांच्या प्रतलातील अंतर १०० मीटरपेक्षाही कमी होणार असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्याचप्रमाणे, या यानांमधील प्रत्यक्षातील सर्वाधिक जवळचे अंतर तीन कि.मी.पेक्षाही कमी असेल, हेही लक्षात आले. इस्रो व नासाने ही संभाव्य टक्कर

टाळण्यासाठी उपाय (सीएएम) वापरण्याचे ठरविले.

त्यानुसार, १८ ऑक्टोबरला अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑक्टोबरला रात्री आठ वाजून २२ मिनिटांनी सीएएमची अमलबजावणी करण्यात आली. इस्रोने टक्कर टाळण्यासाठी ‘चांद्रयान २’ च्या ध्रवीय कक्षेत बदल करण्यात आला. ही दोन्ही याने साधारणत: एकाच ध्रुवीय कक्षेत चंद्राची परिक्रमा करतात. त्यामुळे, चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर ते एकमेकांजवळ येतात. चांद्रयान गेल्या दोन वर्षांपासून चंद्राची परिक्रमा करत आहे. कक्षा निर्धारण केल्यानंतरच्या डेटानुसार चांद्रयान व एलआरओ भविष्यात पुन्हा एकमेकांच्या अशा प्रकारे जवळ येणार नसल्याचेही उघड झाले.

चांद्रयान मोहिमेतील पहिलीच वेळ

अंतराळातील कचरा किंवा इतर वस्तूंशी होणाऱ्या धडकेचा धोका कमी करण्यासाठी अंतराळ संस्थांकडून टक्कर टाळण्याचा उपाय वापरला जातो. इस्रोकडून नियमितपणे यानाजवळील वस्तूंवर लक्ष ठेवले जाते. मात्र, चांद्रयानासारख्या महत्वपूर्ण अंतराळ मोहिमेसाठी अशा प्रकारचे पाऊल उचलण्याची ही इस्रोची पहिलीच वेळ आहे.

loading image
go to top