ISRO : भविष्यातील मंगळ मोहिमेसाठी पहिले पाऊल

भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम यशस्वी झाली. याकडे भविष्यातील मंगळ मोहिमेकडे टाकलेले पहिले पाऊल म्हणून पाहता येईल.
chandrayaan 3 successfully land on moon 23 aug 2023 step towards mars mission isro
chandrayaan 3 successfully land on moon 23 aug 2023 step towards mars mission isrosakal

भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम यशस्वी झाली. याकडे भविष्यातील मंगळ मोहिमेकडे टाकलेले पहिले पाऊल म्हणून पाहता येईल. अवकाश उद्योग, परराष्ट्र संबंध, संरक्षण क्षेत्रावर काय परिणाम होणार, याविषयीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रिया...

डॉ. अजित केंभावी (ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ)

चंद्रावर काही जागांवर सूर्यप्रकाश कधीही पोचू शकत नाही. तसेच चंद्रावर पाणी असण्याची शक्यता आहे. त्याचा शोध ‘चांद्रयान ३’द्वारे घेतला जाईल. या मोहिमेच्या यशानंतर भारतीय नागरिक खूप उत्स्फूर्त झाले आहेत.

नागरिकांच्या पाठिंब्यामुळे भारत अवकाश संशोधनात अधिकाधिक महत्त्वाकांक्षी मोहिमा आगामी काळात हाती घेईल. इस्रोने ‘चांद्रयान ३’चे ‘सॉफ्ट लॅंडिंग’ केले ते पूर्णपणे स्वायत्त होते. शेवटच्या टप्प्यातील संपूर्ण नियंत्रण हे अंतराळ यानाला (स्पेस क्राफ्ट) दिला होता.

यानिमित्ताने अवकाश मोहिमा करण्याची उच्च पातळीवर स्वायत्त तंत्रज्ञान आपल्याकडे असल्याचे भारताने जगाला दाखवून दिले. अवकाश मोहिमेबरोबरच अवकाश संशोधनातील स्वायत्त तंत्रज्ञान निर्मितीतील आपले महत्त्वाचे पाऊल आहे.’’

आगामी काळात अवकाश मोहिमा करण्यास इच्छुक असणाऱ्या देशांसाठी भारत आदर्श असेल अनेक देश भारताच्या मदतीने अवकाश संशोधन करण्यास पुढे येतील ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील ‘रोव्हर’च्या साहाय्याने इतर देशांनाही संशोधनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होईल कमी खर्चात यशस्वी अवकाश मोहिमा करणारा देश म्हणून जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण झाली.

भारतात कमी खर्चात अवकाश मोहिमा यशस्वी होत असल्याने अन्य देशांसमोर नवे आव्हान उभे राहील कोणत्याही देशांचे सहकार्य न घेता भारताचा स्वत:च्या हिमतीवर अवकाश मोहिमा करण्याचा आत्मविश्वास वाढला संपूर्ण जगाचे लक्ष अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरलेल्या ‘आदित्य-एल वन’ मोहिमेकडे लागले आहे.

डॉ. भालचंद्र जोशी (ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा मानद प्राध्यापक, राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र) ‘चांद्रयान-३’मुळे भारताच्या स्वयंचलित लॅंडिंग प्रणालीची अचूकता सिद्ध झाली आहे. ज्याचे इतर देशांनाही खूप आकर्षण आहे.

अमेरिकेसारख्या देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. पण, त्यांनी प्रत्यक्ष चंद्रावर याची चाचणी घेतली नाही. त्यामुळे भारत आता आंतरराष्ट्रीय अवकाश क्षेत्रात नेतृत्व करेल. आपल्याकडे दळणवळणाचे (टेलिकम्युनिकेशन) तंत्रज्ञान प्रगल्भ होते. म्हणूनच ही मोहीम यशस्वी होऊ शकली.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सर्वांत प्रथम उतरणे हे महत्त्वाचे यश भविष्यातील मंगळ मोहिमेसाठी पहिले पाऊल चंद्राचा उपयोग अवकाश स्थानक म्हणून करण्याचा विचार आहे, त्यासाठी आश्वासक पाऊल प्रज्ञान बग्गीतील उपकरणांमुळे चंद्राचे नवे विज्ञान समोर येईल चंद्राच्या मागच्या बाजूला रेडिओ दुर्बीण बसविण्याचा विचार आहे, अशा भविष्यकालीन संशोधन मोहिमांसाठी ही मोठी उपलब्धी.

लीना बोकील (नासा स्पेस एज्युकेटर) ‘चांद्रयान-३’चे यशस्वी लँडिंग ही अतिशय ऐतिहासिक घटना आहे. दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करण्यासाठी खूप आव्हाने होती, पण तेथेच अनेक रहस्ये दडली असतील, असा अंदाज होता. ती शोधणे आता सोपे जाईल.

दक्षिण ध्रुवाबाबत अनेक रिसर्च पेपर झाले होते, मात्र आता प्रत्यक्ष प्रयोगांनी ते सिद्ध करता येणार चांद्रयानावरील मोहिमेवरील सर्व खर्चाचा परतावा मिळेल इस्रोच्या अवकाश संशोधनात मोठी मदत होणार आयुका, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांसारख्या अनेक संशोधन संस्थांना मोहिमेचा फायदा होईल मोहिमेचे निष्कर्ष इस्त्रोसह नासासाठीदेखील महत्त्वाचे ठरतील. युरोपियन स्पेस एजन्सी आणि रशियाला ही मोहीम अभ्यास म्हणून उपयोगी ठरेल

डॉ. रघुनाथ माशेलकर (अध्यक्ष, पुणे इंटरनॅशनल सेंटर) संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण, भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेची सुरुवात ६१ वर्षांपूर्वी सायकलवरून झाली होती. रॉकेटसाठी लागणारे सुटे भाग त्यावेळी शास्त्रज्ञांनी सायकलवरून वाहिले. त्यानंतर आज आपण चंद्रावर जाऊन पोचलो.

आपण कोणाचेही अनुयायी नाही, तर जगाचे नेतृत्व करू शकतो हे यातून ठळकपणे पुढे आले कमीत कमी खर्चात मोहीम यशस्वी केली. ‘मंगलयान’ मोहिमेचा खर्चही अमेरिकेच्या तुलनेत १० टक्के होता. हे भारताचे वैशिष्ट्य होते. कमी खर्चातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे इंग्रजीमधील ‘फेल’ याचा अर्थ ‘फर्स्ट अटेंम्प्ट इन लर्निंग’ असा आहे.

‘चांद्रयान २’मधील चुका यात दुरुस्त केल्या. त्यामुळे हे यशस्वी झाले ‘चांद्रयान २’च्या अपयशामुळे भारतीय शास्त्रज्ञ खचले नाहीत, त्यांनी नव्या उमेदीने नवीन मोहीम आखली या निमित्ताने संपूर्ण देश एकत्र आला. प्रत्येक भारतीय हे थेट प्रक्षेपण पाहात होता. त्यामुळे भारावून टाकणारा ऐतिहासिक दिवस होता.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (अभ्यासक, आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण) अवकाश संशोधनात चंद्रावर यान पाठविणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. त्यातही दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे ‘चांद्रयान-३’ उतरविणारा भारत जगातील पहिला देश आहे. त्यामुळे अवकाश संशोधन क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पायरी मानली जाते आहे.

अवकाश संशोधनात अमेरिका आणि रशिया यांची मक्तेदारी होती. त्यानंतर चीनने यात शिरकाव केला. मक्तेदारीला मोडून काढणारा भारत हा चीननंतरचा आशिया खंडातील दुसरा देश ठरला आहे. आता भारत आण्विक शस्त्रे असणारा, अवकाश संशोधनात चांद्रयान आणि मंगळयान यशस्वी करणारा आणि जीडीपी ६.५ टक्के ठेवणारा देश आहे. भारत जगातील महत्त्वपूर्ण सत्ता बनली आहे.’’

अमेरिकेच्या गटातील क्वाड, जी-७, जी-२०; तर रशिया-चीन गटातील ब्रिक्स, शांघाय कॉर्पोरेशन यात भारताचे महत्त्व वाढेल आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल वेगाने होईल व्यावसायिक अवकाश संशोधनात भारत अग्रेसर ठरेल भारत इतर देशांचे उपग्रह सोडत आहे; तर आपल्या उपग्रहावर आधारित माहितीसाठी इतर देशांशी करार होत आहेत. येत्या काळात हे आणखी वाढेल.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान यशस्वी उतरल्याने देशाचे फक्त आकाशातील सामर्थ्य वाढले नाही, तर अवकाशातही आपले प्राबल्य अधोरेखित झाले आहे. भारतीय सशस्त्र दलातील वेगवेगळ्या भागात आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी ‘चांद्रयान ३’ मोहीम निश्चित उपयुक्त ठरेल.

दूरच्या अंतरावरून होणाऱ्या संदेशाची स्वयंचलित अचूक देवाण-घेवाण (टेलिमेट्री) हे या मोहिमेने अधोरेखित केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर इतक्या चांगल्या पद्धतीने अलगद उतरण्याची (सॉफ्ट लँडिंग) किमया केल्याने संरक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर करणे भविष्यात शक्य होईल.

चंद्रावरील खनिज संपत्तीच्या माहितीचा उपयोग आत्मनिर्भर भारतासाठी होईल मोहिमेमध्ये यंत्रमानवाचा (रोबोटिक) कुशलतेने वापर झाला, हे तंत्र संरक्षण दलात विकसित करणे शक्य चंद्रावर आढळलेल्या खनिजाचे विश्लेषण होईल तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात युद्धसज्जता वाढविणे शक्य होईल.

दीपक करंदीकर (अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲँड ॲग्रिकल्चर) ‘इस्त्रो’ला मिळालेल्या यशामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्थांचा हुरूप वाढणार असून, या क्षेत्रातील प्रगतीला वेग येईल मटेरिअल सायन्समध्येही आणखी मोठी मजल मारता येईल. नवे तंत्रज्ञानही उद्योगांपर्यंत पोचेल. ‘चांद्रयान ३’ हे संपूर्ण ऑटोमेशन होते. त्यामुळे देशाची कामगिरी अधोरेखित झाली.

नव्या तंत्रज्ञानाचा उत्पादन, एव्हिएशन क्षेत्राला मोठा फायदा होणार अवकाश मोहिमांमध्ये उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढेल देशात विकसित झालेले तंत्रज्ञान उद्योगांत पोचेल मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योगांनाही फायदा होईल जागतिक स्तरावर भारतीय संशोधन संस्था, उद्योगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल ऑटोमेशन, एसपीएम क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना मिळेल.

डॉ. श्रीकांत परांजपे (शिक्षण क्षेत्र) आपला देश अण्वस्त्रधारक झाल्यानंतर प्रगत देशांनी असंख्य निर्बंध लादली होती. पण, त्यातूनही देशाने स्वावलंबनाची कास धरत यशस्वी मात केली. त्याच पद्धतीने ‘चांद्रयान ३’चे यश आहे. देशातील तरुणांनी कष्ट केल्यास जागतिक पातळीवर सक्षमपणे देशाला पुढे घेऊन जाता येईल.

जागतिक समस्यांना आत्मविश्वासाने तोंड देण्याची देशात क्षमता असल्याचे मोहिमेतून सिद्ध देशातील तरुणांमध्ये क्षमता आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने वापर करण्याचे प्रोत्साहन स्पेस, अण्वस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक यात कष्ट केल्यास यश मिळविता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com