Chandrayaan-3: काही गडबड झाली तरी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार, कारण...; मोहिमेतील वैज्ञानिकाला विश्वास

isro to launch Chandrayaan-3 on 30th July this year landing date decided ISRO chief
isro to launch Chandrayaan-3 on 30th July this year landing date decided ISRO chief

Chandrayaan-3 Will Land Safely Even If Everything Goes Wrong

नवी दिल्ली- चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरमध्ये अंगभूत 'सुरक्षा मोड' आहे. त्यामुळे काही विपरित घडलं तरी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असा विश्वास एअरोस्पेस शास्त्रज्ञ राधाकांत पाधी यांनी व्यक्त केलाय. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर चांद्रयान-३ मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चांद्रयान-३ चंद्रावर नक्की उतरेल, याबाबत कसलीही शंका नाही, असं ते म्हणालेत.

चांद्रयान-२ मध्ये विक्रम लँडर यानाची गती नियंत्रित करु शकला नाही. त्यामुळे तो अयशस्वी झाला. पण, आता चांद्रयान-३ मध्ये आपण ही सुधारणा केली आहे. विक्रम लॅडरचे पाय आता मजबूत करण्यात आलेत, असं प्रोफेसर राधाकांत पाधी म्हणाले. पाधी यांचा चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ या दोन्हींच्या मोहिमेमध्ये सहभाग आहे. बेंगळुरुमधील एअरोस्पेस विभागही चंद्र मोहिमेत मदत करत आहे.

isro to launch Chandrayaan-3 on 30th July this year landing date decided ISRO chief
Bail Approved: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाकडून जामीन मंजूर

पाधी म्हणाले की, चांद्रयान-२ मोहिमेवेळी वैज्ञानिकांमध्ये अती आत्मविश्वास होता. पण, चांद्रयान-३ सर्व अडचणी लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. त्यामुळे काहीही चुकीचं घडलं तरी चांद्रयान-३ चंद्रावर उतरेल. मला याबाबत पूर्ण आत्मविश्वास आहे. विक्रम लँडर चंद्रावर योग्य ठिकाणाचा शोध घेईल आणि त्याच ठिकाणी तो उतरेल.

विक्रम लँडरमध्ये दोन ओनबोर्ड कॉम्प्युटर आहेत. चांद्रयान-२ मध्ये तो एकच होता. चांद्रयान-३ ला सर्व परिस्थितीमध्ये घालून तपासण्यात आलं आहे. त्यामुळे ९९.९९ टक्के चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होईल, असं ते म्हणाले. चांद्रयान-३ बुधवारी म्हणजे २३ तारखेला सहाच्या सुमारास चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयानचे चंद्रावर उतरण्याच्या क्षणाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे. जर मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे.

isro to launch Chandrayaan-3 on 30th July this year landing date decided ISRO chief
Sanjay Raut : संजय राऊत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणूक का लढवणार?

चांद्रयानाने घेतली चंद्राची छायाचित्रे

चांद्रयान पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले तेव्हा त्याची कक्षा 164 किमी x 18,074 किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी चंद्राची छायाचित्रेही टिपली. इस्रोने त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com