Sanjay Raut : संजय राऊत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणूक का लढवणार?

Sanjay Raut
Sanjay Raut esakal

पक्षाचा आदेश आल्यास, पक्ष सांगेल तिथून लोकसभा निवडणूक लढवू, असं संजय राऊत म्हणालेत. त्यामुळे संजय राऊत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. पण खरंच संजय राऊत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणूक लढवणार का? आणि ते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कितपत गरजेचं आहे, हे जाणून घेऊयात..

राज्याचं राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर आहे. शिवसेना-राष्ट्रवादीतली बंडखोरी, फूट अन् राज्यात शिंदे-अजितदादांच्या गटाला घेऊन भाजपचं सरकार... अशातच राज्यात शिवसेना ठाकरे गटाचा एक आश्वासक चेहरा म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जातं. २०१९ ला भाजपाशी फारकत घेतल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार येईपर्यंत राऊतांनी गाजवलेली सकाळ महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिली.

Sanjay Raut
Telangana Vidhansabha Election : BRS प्रमुख के.चंद्रशेखर यांनी केली उमेदवारांची यादी जाहीर; स्वत: या जागेवरून लढवणार निवडणूक !

पवारांच्या गाठीभेटी घेऊन महाविकासआघाडी स्थापन करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यातही राऊतांचा मोठा हात असल्याच्या चर्चा होत्या. पण, याच संजय राऊतांवर त्यांच्या वाचाळपणामुळे पक्षाच्या अडचणी वाढताहेत, शिवाय आमदारांच्या मतांच्या जोरावरच संजय राऊत राज्यसभेचे खासदार झाल्याचा दावाही शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी केलाय. त्याला राऊतांनीही आपल्या खास शैलीत वेळोवेळी उत्तर दिलंय. अशातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा संजय राऊतांचं नाव चर्चेत आलंय. त्यातच ते ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जातंय.

दुसरं कारण सांगायचं झाल्यास, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि त्यामुळे पक्षाची होत असलेली वाताहत. सध्या सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे सक्षम असल्याचं दिसतंय. पण, त्याला उत्तर येत्या निवडणुकांमधून मिळेल असं दोन्ही बाजूंकडून कायम म्हटलं जातंय. अशातच शिवसेना ठाकरे गटाकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार आणि खासदार आहेत. त्यातील काही चेहरेच प्रसिद्धीच्या झोतात आहेत.

Sanjay Raut
Onion Export Duty Hike: कांद्याच्या दराला लागणार दृष्ट! 40 टक्के निर्यात शुल्कामुळे शेतकरी संतप्त

त्यामुळे मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा जरी ठाकरे गट करत असला तरी मुंबईत ६ पैकी फक्त एकच खासदार ठाकरे गटाचा आहे ते म्हणजे अरविंद सावंत. कारण राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटाची वाट धरलीए. तर मुंबईतल्या उर्वरित तीन जागांवर पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक असे भाजपाचे तीन खासदार आहेत. त्यामुळे बालेकिल्ला म्हणणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राऊतांना लोकसभेला उतरवावं लागेल असं चित्र आहे.

तर आता ईशान्य मुंबई मतदारसंघाचीच चर्चा का होतेय?

तर याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा २०१९ मध्ये जावं लागेल. कारण किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातले वाद राज्याला काही नवीन नाहीत. पत्राचाळ घोटाळा असो, उद्धव ठाकरेंवर आरोप करणं असो वा कोविड खिचडी घोटाळ्याचा आरोप असो, सोमय्यांच्या रडारवर कायम संजय राऊत आलेत. पण राऊत-सोमय्यांमधला वाद पेटण्याचं मूळ कारण म्हणजे २०१९ ला सोमय्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला राऊतांनी केलेला विरोध. कारण मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द ही उपनगरं ईशान्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघात येतात.

त्यातील मुलुंड आणि भांडुप अगदी शेजारी-शेजारी असणारी उपनगरं. किरीट सोमय्या मुलुंडचे आहेत तर संजय राऊत भांडुपचे. अशातच ईशान्य मुंबईची जागा शिवसेनेनं २०१९ साली भाजपासाठी सोडली पण सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे सोमय्या विरुद्ध राऊत यांच्यातल्या वादाची ठिणगी इथेच पडली. आणि त्यांच्यातला जो वाद सुरु झाला ती मालिका अजूनही सुरुच आहे.

कारण याच मतदारसंघातून १९९९ साली काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा तर, २०१४ साली राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटलांचा पराभव करुन सोमय्यांनी युतीकडून खासदार म्हणून ही जागा जिंकली होती. त्यामुळे विद्यमान खासदार असूनही राऊतांच्या प्रखर विरोधामुळे २०१९ साली भाजपानं सोमय्यांचा पत्ता कापला आणि मनोज कोटकांच्या गळ्यात खासदारकीच्या उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे सोमय्या विरुद्ध संजय राऊत या मालिकेतले अनेक भाग आपण तेव्हापासून पाहतोय.

त्यामुळे आता संजय राऊतांनी जर ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली तर सोमय्याही त्यांना पाडण्यासाठी आपली सर्वतोपरी ताकद लावणार हे निश्चित. तर, सर्वसामान्य शिवसैनिकही निवडणुकीला उभा राहिला तरी दोन—व्वा दोन लाखांच्या मताच्या फरकानं विजयी होईल, असा विश्वास राऊतांना आहे. त्यामुळे राऊतांचा विश्वास येत्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत खरा ठरणार का हे पाहणं महत्वाचं असेल. पण कसंय ना, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं २०१९ ला झालं. कारण भाजपच्या मनोज कोटक यांची नगरसेवक पदावरुन थेट खासदार म्हणून बढती झाली. त्यामुळे भाजपानं त्यांची उमेदवारी कायम ठेवल्यास संसदीय कामकाजाचा अनुभव पाहता संजय राऊत त्यांच्यासमोर उजवे ठरतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणेंनी मात्र राऊतांना रत्नागिरी, सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे संजय राऊतांना खरंच लोकसभेच्या रिंगणात उतरवून बंडखोरांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार का? आणि संजय राऊतांनाही निवडणुकीत जनतेची मतं मिळणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com