तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम पुढे ढकलली

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 July 2019

56 मिनिटे 24 सेकंद आधीच काऊंटडाऊन रोखण्यात आले आहे. फ्युएल कंडक्टरमध्ये बिघाड  झाल्याने काऊंटडाऊन रोखले असल्याचे समजते. यावेळी क्रायोजेनिक इंधन भरताना तांत्रिक अडचण आली असल्याचे सांगण्यात आले आहे. इस्रोने ट्विट करून याची माहिती दिली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून याबाबतचे निवेदनही इस्रोतर्फे देण्यात आले आहे.

नवी दिल्लीः इस्रोनं चांद्रयान-2 ही मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून  तांत्रिक कारणास्तव आता नियोजित वेळेत चांद्रयान 2 हे उड्डाण करणार नाही. इस्रो पत्रकार परिषद घेऊन लवकरच या संदर्भातली माहिती देणार आहे.

56 मिनिटे 24 सेकंद आधीच काऊंटडाऊन रोखण्यात आले आहे. फ्युएल कंडक्टरमध्ये बिघाड  झाल्याने काऊंटडाऊन रोखले असल्याचे समजते. यावेळी क्रायोजेनिक इंधन भरताना तांत्रिक अडचण आली असल्याचे सांगण्यात आले आहे. इस्रोने ट्विट करून याची माहिती दिली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून याबाबतचे निवेदनही इस्रोतर्फे देण्यात आले आहे.

दरम्यान, चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने भारताचे चांद्रयान-2 आज (ता. 15) काही वेळात अवकाशात झेपावणार होते. 'बाहुबली' म्हणजेच, जीएसएलव्ही एमके-3 हा प्रक्षेपक भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या 'चांद्रयाना'ला अवकाशात कक्षेत सोडण्यात येणार होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan2 launch has been called off for today.