गोवा विधानसभेत फॉर्मेलीनवरून गोंधळ

अवित बगळे
गुरुवार, 19 जुलै 2018

पणजी : माशात फॉर्मेलीन या घातक रसायनाचे अंश सापडल्यामुळे त्या विषयावर विधानसभेत सर्वप्रथम चर्चा करावी या मागणीसाठी आज विरोधी कॉंग्रेसच्या आमदारांनी पाच वेळा सभापतींच्या आसनासमोरील जागेत धाव घेतली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज सुरवातीला चार वेळा तर पाचव्यावेळी उद्यापर्यंत तहकूब करावे लागले.

मडगाव येथील मासळी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासन खात्याने केलेल्या माशांच्या तपासणीत माशांत फॉर्मेलीन या मृतदेह टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाचे अंश सापडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. लोकांनी मासे खरेदी करणे थांबवले आहे. सरकारनेही याची दखल घेत परराज्यातून आणण्यात येणाऱ्या मासळीवर 15 दिवसांची बंदी घातली आहे.

याविषयावर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या 16 आमदारांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानुसार त्या प्रस्तावावर चर्चा करावी या मागणीवर कॉंग्रेसचे आमदार ठाम राहिले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी इतर विषय़ महत्वाचे आहेत मात्र हा विषय़ अत्यंत महत्वाचा आणि गोमंतकीयांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने त्यावर आधी चर्चा करा असा आग्रह धरला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय़ उपस्थित करण्यासाठी परवानगी दिली असल्याने आणि त्याची नोंद कामकाज वेळापत्रकात केली गेली असल्याने स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्याचे नाकारले. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार पाच वेळा सभापतींच्या आसनासमोरील जागेत आले. त्यामुळे एकूण पाचवेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.

Web Title: chaos in goa assembly for formalin