
चार धाम यात्रा : यमुनोत्रीमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू; ऑक्सिजनची कमी
यमुनोत्री (Yamunotri) धाममध्ये २४ तासांत तीन यात्रेकरूंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तिन्ही प्रवाशांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रवासी राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. ते चारधाम यात्रेसाठी आले होते. ते यमुनोत्री धाम दर्शनासाठी जात होते. त्यांच्या मृत्यूंनंतर प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे. यमुनोत्री (Yamunotri) धामच्या पायथ्याशी असलेल्या ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. (3 passengers killed in Char Dham Yatra at Yamunotri)
यमुनोत्री धाम यात्रेच्या (Char Dham Yatra) पहिल्या दिवशी मंगळवारी तीन यात्रेकरूंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अनिरुद्ध प्रसाद जैस्वाल (६५, रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांचा यमुनोत्री (Yamunotri) मंदिराच्या पुलाजवळ मृत्यू झाला. कैलाश चौबिसा (६३, रा. डुंगरपूर, राजस्थान) यांचा भैरव मंदिराजवळ व शकुन परिहार (६३, रा. जबलपूर) यांचा भानियालीगड जवळ मृत्यू झाला, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले.
हेही वाचा: राणादा अन् अंजलीबाईचं जमलं! साखरपुड्याचे फोटो व्हायरल
मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. यात्रेकरूंनी (passenger) पायी प्रवास सुरू करण्यापूर्वी आरोग्य तपासणी करून घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्याचबरोबर प्रवाशांनी हृदयविकाराचा धोका पत्करून अधूनमधून प्रवास करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रवासी मार्गावरही आरोग्य विभाग सतर्क
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. चारधाम यात्रा (Char Dham Yatra) टिहरी जिल्ह्यातूनही जाते. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या रुग्णालयांमध्ये औषधांपासून उपचारापर्यंतची व्यवस्था करण्यात येत आहे. विभागाकडून प्रवासाच्या मार्गावर फलक लावण्यात आले आहे. त्यावर डॉक्टरांचे क्रमांकही लिहिलेले आहेत.
हेही वाचा: दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् आजोबा, नातवाला चिरडले; सून गंभीर जखमी
वैद्यकीय शिबिरे सुरू
जिल्ह्याचे प्रवेश केंद्र असलेल्या मुनिकेरती येथे वैद्यकीय शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. यात्रेच्या मार्गावरील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांना २४ तास तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे, असे डॉ. संजय जैन यांनी सांगितले.
Web Title: Char Dham Yatra 3 Passengers Killed In Yamunotri Lack Of Oxygen
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..