सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरोधातील आरोपांची होणार चौकशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

- सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर झालेले आरोप हे षड्यंत्र आहे का? याची केली जाणार चौकशी. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार ही एक कटाचा भाग आहे, असा दावा एका वकिलाने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यानंतर आता त्यांच्यावरील झालेले आरोप हे षड्यंत्र आहे का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. 

न्यायालयीन निकाल आपल्या इच्छेप्रमाणे लागावेत, यासाठी एक टोळीच कार्यरत आहे. या गैरप्रकारांना सरन्यायाधीशांनी पायबंद घातला होता. त्यामुळेच त्यांच्यावर लैंगिक शोषणासारखे आरोप करत हा कट रचला गेला, असा दावा वकील उत्सव सिंग बैंस यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला. त्यामुळे आता या आरोपांविरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यापार्श्वभूमीवर आता निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनायक याप्रकरणी चौकशी करणार असून, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक, गुप्तचर विभागप्रमुख आणि दिल्ली पोलिस आयुक्तांनी याप्रकरणी सहकार्य करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
 

Web Title: The charges against CJI Gogoi will be investigated