
जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातल्या चशोती गावात ढगफुटीनंतर अचानाक आलेल्या पुरामुळे शेकडो लोक मलब्याखाली दबले गेलेत. आतापर्यंत ६० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. तर १०० पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात असून बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा आहे. किमान मृतदेह तरी मिळावा यासाठी नातेवाईक बचावकार्याकडे डोळे लावून बसले आहेत.