ChatGPT राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

ChatGPT जगभरात मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध होत आहे. या आर्टिफीशियल इंटेलिजंसला लोक फार पसंत करत आहेत.
ChatGPT Latest News
ChatGPT Latest Newsesakal

Is ChatGPT Threat For National Security : ChatGPT वेगाने वाढणाऱ्या प्रोग्राम्सपैकी एक आहे. यातून तुमच्या प्रश्नांना झटपट आणि सोपे, सुटसुटीत उत्तरं दिले जातात. AI च्या या क्षमतेमुळे अमेरिकेच्या लॉयर्सचं लक्ष तिकडे वेधलं गेलं.

त्यामुळे अमेरिकी नेत्यांना आता देशाच्या सुरक्षेविषयी आणि शिक्षणाविषयी ChatGPT च्या प्रभावाची चिंता वाटायला लागली आहे. लाँचच्या २ महिन्यातच या AI ChatBot चे महिन्याचे वापरकर्ते १० करोडोंवर पोहचण्याचा अंदाज लावला जात आहे.

कंझ्युमर अ‍ॅप्लिकेशनच्या इतिहासात सगळ्यात वेगात वाढणारं हे AI प्लॅटफॉर्म बनलं आहे. या आर्टिफीशिल इंटेलिजंसला ओपन AI ने विकसीत केलं आहे. सध्या हे लोकांसाठी फ्री आणि पेड अशा दोन्हा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

AI पासून धोका निर्माण होऊ शकतो का?

आजवर या AI ChatBot च्या क्षमचेती चर्चा सुरू होती. पण आता यामुळे काय समस्या उद्भवू शकतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे हे आल्याने अनेक कामं सोपी होऊ शकतात तिथे याच्या वापरातून चुकीची माहिती वेगात पसरण्याचा मोठा धोका संभवतो.

विद्यार्थी याचा वापर परीक्षेत नकल करण्यासाठी करू शकतात. अमेरिकेतले नेता टेड लीयू यांनी यासंदर्भात न्यूयॉर्क टाइम्समध्ये आपलं मत लिहीलं होतं. AI समाजाला वाढण्यासाठी आश्चयकारक पद्धतीने मदत करू शकतो. तर दुसरीकडे AI त्रासदायकही ठरू शकतो.

ChatGPT Latest News
ChatGPT ला टक्कर द्यायला आलं आता Google Bard, समजून घ्या टेक्नोलॉजी

विशेषतः असं AI जे नियंत्रणाबाहेर आहे. ज्यावर कोणाचा वचक नाही. यात लीयू यांनी एक रेझ्युलेशन सादर केलं. ज्यात ChatGPT द्वारा लिहिलं होतं की, काँग्रेसला AI वर लक्ष केंद्रीत करायला हवं, ज्यामुळे AI चा विकास सुरक्षित, अथिकल आणि अमेरिकाच्या लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान राखला जाईल.

Open AI चं काय म्हणणं आहे?

जानेवारी २०२३ मध्ये Open AI चे कार्यकारी संचालक सॅम आल्टमन हे कॅपिटल हिल येथे गेले होते. त्यांनी टेक्नॉलॉजीशी जोडलेल्या नेत्यांची भेट घेतली. ChatGPT ला न्युयॉर्क स्कूलमध्ये आधीच बॅन करण्यात आलं आहे. कारण तिथे लक्षात आलं की, मुलं आपला बोमवर्क या AI ChatBot कडून करून घेत होते, म्हणून शाळेने ते बॅन केले.

ChatGPT Latest News
Google AI : ChatGPT ला सडेतोड उत्तर देणार गुगलचे AI; या तारखेला होणार धमाका!

Open AI ने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे की, चुकीच्या कामांमध्ये ChatGPT चा वापर व्हावा असं आम्हाला वाटत नाही. यासाठीच आम्ही एक मिटिगेशन तयार करत आहोत. ज्यातून हे समजेल की, ते टेक्स्ट सिस्टमद्वारा जनरेट करण्यात आलं आहे की नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com