छत्तीसगडने उतरविला 'रमण का चष्मा' (व्हिडिओ)

Raman Singh
Raman Singh

रायपूर : छत्तीसगडमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या रमणसिंह यांना काँग्रेसने धोबीपछाड देत सत्तेतून पायउतार केले. कोणताही चेहरा नसताना काँग्रेसने निवडणुकीत उतरून त्यांना टक्कर दिली आणि याला साथ मिळाली छत्तीसगडमधील जनतेची. अखेर छत्तीसगडमधील जनतेने रमण का चष्मा उतरविल्याचे पाहायला मिळाले.

छत्तीसगडमध्ये 90 जागांपैकी 68 जागा जिंकत भाजपला पूर्णपणे नेस्तनाबूत केले. भाजपला याठिकाणी अवघ्या 16 जागा जिंकता आल्या. गेल्या निवडणुकीत भाजपला 49 जागा मिळाल्या होत्या. भाजपने रमणसिंह यांना पुन्हा एकदा पुढे करत निवडणूक लढविली होती. तर, त्याउलट काँग्रेसकडे एकही आश्वासक चेहरा नसताना निवडणूक लढविली होती आणि त्यांना त्यात यश आले.

काँग्रेसने या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या प्रचाराचा प्रमुख चेहरा होता. तसेच जाहिरातीच्या माध्यमातूनही काँग्रेसने रमणसिंह यांचे अपयश उजेडात आणले होते. काँग्रेसने केलेल्या जाहिरातीत 'रमण का चष्मा' घातला की सर्वकाही चांगले आणि प्रगत दिसते असे दाखविण्यात आले होते. काँग्रेसची ही जाहिरात सोशल मीडियात चर्चेत राहिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com