आता हनुमान जाट असल्याचा नवा जावईशोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

लखनौ- रामभक्त हनुमानाची जात शोधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सुरू झालेला वाद शमणे दूरच, त्यात अजूनही भर घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काल उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेतील आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुसलमान असल्याचे सांगितल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान जाट असल्याचा दावा केला आहे. 

जाट समाजाच्या व्यक्तीचा स्वभाव असतो की, जर कोणावर अन्याय होत असेल तर तो माणूस अनोळखी व्यक्तीला देखिल मदत करतो, रामभक्त हनुमानजी यांचा स्वभावही काहीसा असाच होता म्हणून हुनुमान हे जाट असावेत असा दावा चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे सांगितल्यानंतर भाजपच्याच आमदाराने हनुमान हा मुस्लिम असल्याचा शोध लावला होता. आता तर हनुमान जाट असल्याचा नवा जावईशोध लावण्यात आला आहे. हनुमानजी सर्वांचे असून, माझ्या मतानुसार ते मुसलमान होते, असे नवाब म्हणाले होते. आपला दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना त्यांनी लावलेला तर्कही अजब आणि हास्यास्पद होता. "मुसलमानांमध्ये रेहमान, रमजान, फर्मान, झिशान, कुर्बान अशी नावे असतात. त्यांच्यातील अनेक नावे हनुमान या नावाशीच साधर्म्य दाखवितात, त्यामुळे हनुमानजी हे मुसलमान होते,' असे नवाब यांचे म्हणणे होते.

योगींनी हनुमान दलित असल्याचे म्हटल्यावर राजकीय पक्षांसह सोशल मीडियावरून जनतेनेही याबाबत टीका केली होती. देवाला जाती-धर्मात अडकविण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त झाली होती. आता मात्र या वादात आणखी भर पडली आहे.

Web Title: Chaudhary Lakshmi Narayan says ' I think Hanuman ji was a Jaat