गरबा-दांडिया खेळायचाय मग आधारकार्ड आणा; बजरंग दलाची सक्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

हिंदू धर्मीयांना गरबा खेळण्यास रोखण्यासाठी यंदा गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करावे अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

हैद्राबाद : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरं फुलू लागली आहेत. नवरात्र उत्सवाचा उत्साह सर्वत्रच पाहायला मिळत आहे. या उत्सवासाठी बाजारातही अनेकांची लगबग दिसतेय. नवरात्र म्हटलं की गरबा, दांडिया तर आलाच, गरबा कार्यक्रमात हिंदू धर्मांव्यतिरिक्त अनेकजण सहभागी होतात. अशा या हिंदू धर्मीयांना गरबा खेळण्यास रोखण्यासाठी यंदा गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करावे अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

बजरंग दलाने मागणी केली आहे की, हिंदू धर्मांव्यतिरिक्त व्यक्तींना ओळखण्यासाठी गरबा प्रवेश स्थळावर आधार कार्डाची सक्ती करावी. याबाबतचे पत्र देखील बजरंग दलाने आयोजकांना दिले आहे. देशात ज्या-ज्या ठिकाणी गरब्याचे आयोजन केले असेल, त्या ठिकाणच्या आयोजकांनी हिंदू धर्माशिवाय कोणत्याही इतर धर्माच्या नागरिकांना गरबा खेळण्यासाठी परवानगी देऊ नये, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून गरबा किंवा दांडिया या उत्साहाच्या कार्यक्रमात हिंदू धर्म व्यक्तीरिक्त अनेक जण सहभागी होतात. ही लोक महिलांचा अपमान करतात, त्यांची छेड काढतात. हे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी आधार कार्डची  सक्ती करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. इतकचं नव्हे तर अनेक ठिकाणी बजरंग दलाची कार्यकर्तेही हजर राहणार आहेत. तसंच जर एखाद्या ठिकाणी अशाप्रकारे कोणताही प्रकार घडला, तर त्या ठिकाणी तात्काळ कारावाई केली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: check aadhar card during entry bajrang dal to garba dandiya organisers