
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात दक्षिण आफ्रिकेतून आठ चित्ते आणले गेले. त्यानंतर ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहेत. या चित्त्यांना खाद्य म्हणून १८० हरीण व चितळ सोडण्यात आली आहेत. यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या. (cheetah kuno national park angry bishnoi samaj wrote a letter to PM Modi and protested for feeding deer in park for hunting)
राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधील बिश्नोई समाज सरकारच्या निर्णयावर आक्रमक झाला असून, या निषेधार्थ त्यांनी हरियाणात धरणे आंदोलनही सुरु केले आहे. तसेच, पंतप्रधाना नरेंद्र मोदींना पत्र लिहित चित्त्यांसाठी हरणांचा बळी नको अशी विनंती बिष्णोई समाजाने केली आहे.
अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या जंगलातून श्योपूरला १८० चितळं आणि हरिण पाठवण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
देवेंद्र बुडिया यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने आपल्या नेतृत्वाखाली भारतातील जंगलांमधील नामशेष झालेल्या प्रजाती पुनर्संचयित करण्यासाठी नामिबियामधून 8 चित्ते आणले आहेत. परंतु, त्यांचे खाद्य मुख्यत्वे चितळ, हरणे इत्यादी जंगलात सोडल्याने बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
काळवीटांचे काय आहे बिश्नोई समाजात महत्त्व?
बिष्णोई समाज हा प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनाही त्यांचे जगण्याचा हक्क असल्याचं मानतात. या समाजातील लोक हे निसर्गाला देव मानतात. निसर्गातील प्रत्येक घटकाच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. वन्य प्राणी आणि झाडांसाठी या समाजातील लोक आपला जीवसुद्धा द्यायला तयार असतात.
काळवीटाला बिश्नोई समाजात विशेष धार्मिक महत्त्व आहे. काळवीट हे गुरु भवान जांम्बेश्वर यांचे रुप असल्याचं हा समाज मानतो. त्यांचे आराध्यदैवत असलेले गुरू जंभेश्वर यांनी दिलेल्या २९ नियमांचे पालन करतात. यापैकी एक नियम म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण आणि झाडांच्या संरक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळेच ते काळवीटाला देवाच्या स्थानी मानतात. काळवीटांना त्रास देणं किंवा त्यांची हत्या करणं हा या समाजाच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हा असल्याचे मानले जाते.
तब्बल 70 वर्षांनंतर भारत देशात चित्ते परतले आहेत. यापूर्वी 1952 मध्ये देशातून चित्ताची प्रजात नष्ट झाली होती. भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली.
भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात पुन्हा चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्तासाठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.