Mission Cheetah : तब्बल 75 वर्षांनी चित्ता परतला भारतात; 'चित्ता' हा शब्द नेमका कुठून आला जाणून घ्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheetah

भारतात 75 वर्षांनंतर 'चिते की चाल' दिसणार आहे.

Mission Cheetah : तब्बल 75 वर्षांनी चित्ता परतला भारतात; 'चित्ता' हा शब्द नेमका कुठून आला जाणून घ्या..

ग्वाल्हेर : भारतात 75 वर्षांनंतर 'चिते की चाल' दिसणार आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया (Namibia) येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात (India) आगमन झालं आहे. हे आठ चित्ते (Cheetah) मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) ठेवण्यात आले आहेत.

चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयानं 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्तासाठी भारत सरकारनं सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जातंय.

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशानं नुकताच अमृत महोत्सव साजरा केला. त्यानंतर अवघ्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 वर्षांनी चित्ते भारतात आणून देशवासियांना अभिमान वाटावा, अशी आणखी एक कामगिरी केली. आज (शनिवार) मोदींच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्यांना सोडण्यात आलं आहे.

हेही वाचा: Narendra Modi : PM मोदींना वाढदिवसानिमित्त तुम्हीही 'शुभेच्छा' पाठवू शकता; फक्त 'हे' काम करावं लागेल

ग्वाल्हेर चंबळ प्रदेशासाठी ही एक मोठी भेट आहे आणि त्यासाठी ही जागा निवडल्याबद्दल इथले लोक पंतप्रधानांचं आभार मानत आहेत. कारण, आजही हा सगळा परिसर दरोडेखोर म्हणून ओळखला जातो. चित्ते केवळ या प्रदेशाची ओळखच बदलणार नाहीत, तर आदिवासीबहुल श्योपूर भागातील रोजगार आणि पर्यटन उद्योगाला नवी उंची देतील.

'चित्ता' या शब्दाची उत्पत्ती कशी झाली

चित्ताच्या उत्पत्तीबद्दल तज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु, चित्ता हा शब्द चित्रक या संस्कृत शब्दापासून आला आहे. भोपाळ आणि गांधीनगर येथील नवपाषाणकालीन गुहेमध्येही चित्ते आढळत होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) माजी उपाध्यक्ष दिव्या भानू सिंग यांनी लिहिलेल्या 'द एंड ऑफ ए ट्रॅजेडी चीता इन इंडिया' या पुस्तकानुसार, 1556 ते 1605 या काळात मुघल सम्राट अकबर यांच्याकडं 1,000 चित्ते होते. काळं हरीण आणि चिंकारा यांच्या शिकारीसाठी त्यांचा वापर केला जात होता. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, भारतीय चित्ताची संख्या शेकडोपर्यंत घसरली होती. 1918 ते 1945 दरम्यान सुमारे 200 चित्ते आयात करण्यात आले. 1947 मध्ये चित्ता भारतात शेवटचा दिसला होता. तेव्हापासून देश त्याच्या परतीची वाट पाहत होते.

हेही वाचा: PM Modi Birthday : 8 वर्षात मोदींनी घेतले 'हे' 8 मोठे निर्णय; जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय झाला परिणाम

मांजर कुटुंबातील हा एकमेव सदस्य आहे, जो मानवांसाठी घातक नाही. तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत चित्त्यानं मानवांवर हल्ला केल्याची एकही घटना समोर आलेली नाही. यामुळंच इराण या आखाती देशात चित्याला पाळीव प्राणी म्हणून पाहिलं जातं. या चित्त्यांच्या आगमनानं देशातील मांजर प्रजातीचे पाचही सदस्य आता भारतात असतील. पूर्वी गुजरात आशियाई सिंहांसाठी, तर मध्य प्रदेश वाघांसाठी ओळखला जात असे.

पर्यटनाला मिळणार चालना

कुनो नॅशनल पार्कमध्ये बिबट्याच्या आगमनानंतर राजस्थानमधील श्योपूर, शिवपुरी आणि रणथंबोरच्या रूपात नवीन पर्यटन सर्किट तयार होणार आहे. पर्यटकांना 253 किमी अंतर आहे. पर्यटन उद्योगाला नवी उंची देणाऱ्या सर्किटमध्ये चित्ता आणि वाघ दिसणार आहेत.

हेही वाचा: VIDEO : व्यासपीठावरच मंत्र्याचं नितीन गडकरींसमोर लोटांगण; असं नेमकं काय घडलं?

चित्त्याबद्दल काही तथ्य

  • जगात अंदाजे 7,100 चित्ते आहेत.

  • निरोगी चित्ता 120 किमी प्रतितास वेगाने धावू शकतो.

  • 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं.

  • देशात 12,852 बिबट्या आहेत.

  • 1972 मध्ये देशात चित्तांचं पुनर्वसन करण्यासाठी पहिला वन्यजीव (संरक्षण) कायदा लागू करण्यात आला.

  • 1985 मध्ये वाइल्डलाइफ ऑफ इंडियानं इराणमधून चित्ते आणण्याचा प्रयत्न केला होता. पण, हा प्रकल्प मागे पडला.

  • चित्ता प्रकल्पाची 2008 मध्ये सुधारणा करण्यात आली. परंतु, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं.

Web Title: Cheetahs Return To India After 75 Years Where Did The Word Cheetah Come From Kuno National Park

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..