चेन्नईतून हैदराबादला पाठवले अमोनियम नायट्रेटचे 10 कंटनेर

ammonium nitrate
ammonium nitrate

चेन्नई - बैरुतमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर भारतातील कस्टम विभागाने चेन्नईतील अमोनियम नायट्रेटचा साठा हैदराबादला हलवला आहे. चेन्नईतील मनाली सत्वा कंटेनर फ्रेट स्टेशनमधून 10 कंटेनरमधून 181 टन अमोनियम नायट्रेट तेलंगणातील हैदराबादला नेण्यात आलं आहे. अजून 27 कंटनेर चेन्नईमध्ये आहेत. लेबनॉनमध्ये झालेल्या स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही पावले उचलण्यात आली आहेत. चेन्नईमध्ये जवळपास 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा गेल्या 5 वर्षांपासून होता. 

चेन्नईजवळ असलेल्या एका कंटनेर फ्रेट स्टेशनवर 697 टन अमोनियम नायट्रेट ठेवण्यात आलं होतं. आता यातील 181 टन साठा हैदराबादला पाठवण्यात आल्यानंतर 561 टन रसायन शिल्लक आहे. ते पुढच्या एक आठवड्याच्या आत हलवण्यात येणार आहे. या सर्व साठ्याचा ऑनलाइन लिलाव केल्यानतंर हैदराबादला पाठवलं जात आहे. 2015 मध्ये तामिळनाडुत हा साठा जप्त करण्यात आला होता. याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे.

कस्टम विभागाच्या 13 नोव्हेंबर 2019 च्या कागदपत्रांनुसार अमोनियम नायट्रेटचा हा साठा 2015 मध्ये जप्त करण्यात आला होता. याचे एकूण वजन 697 टन इतकं असल्याचं म्हटलं आहे. मात्र मद्रास उच्च न्यायालयाच्या नोंदीमध्ये हा साठा 742 टन असल्याचं म्हटलं आहे. अमोनियम नायट्रेटचा हा पूर्ण साठा 2015 मध्ये दक्षिण कोरियातून कोणत्याही परवान्याशिवाय एका कंपनीने आणला होता. यासंबंधी न्यायालयात सुरु असलेला खटला गेल्या वर्षी निकालात काढला. गेल्या पाच वर्षांपासून हा साठा सीएसएफमध्ये ठेवला होता. 

चेन्नईतून हैदराबादला अमोनियम नायट्रेट घेऊन जाण्याची सर्व प्रक्रिया चेन्नईचे पोलिस अधिकारी आणि पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या देखरेखीखाली झाली. अमोनियम नायट्रेटचची वाहतूक आणि सुरक्षेची साधने तपासल्यानंतर कंटनेर पाठवण्यात आले. चेन्नईमध्ये अमोनियम नायट्रेटचा सर्व साठा शहरापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका फ्रेट स्टेशनवर ठेवण्यात आला होता. गोदामाच्या आजुबाजूला नागरी वस्ती नाही. 

कशासाठी वापरतात अमोनियम नायट्रेट
अमोनियम नायट्रेट हे गंध नसलेलं रसायन असून अनेक कामांसाठी याचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी खतांमध्ये आणि बांधकाम किंवा खाणकामात स्फोट करण्यासाठी वारतात. ज्वलनशिल पदार्थ असेलल्या अमोनियम नायट्रेटला आग लागल्यास स्फोट होतो. 

साठा करण्यासाठी नियम
लनशिल रसायन असल्यानं अमोनियम नायट्रेटचा जिथं याचा साठा करायचा आहे ते पूर्ण फायरप्रूफ असणं गरजेचं आहे. तिथं कोणताही नाला किंवा गटार असू नये ज्यामध्ये अमोनियम नायट्रेट जमा होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com