Coromandel Express Accident : ओडिशात भीषण अपघात! मालगाडीला एक्स्प्रेसची धडक, अनेकजण अडकले

Coromandel Express Accident
Coromandel Express Accident

Coromandel Express Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. यामध्ये १३२ जखमींना मेडिकल कॉलेज, बालासोर येथे हलवण्यात आले आहे.

यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर येत आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधील हावडा पर्यंत धावते. ही गाडी शालिमार स्थानकावरून दुपारी ३.१५ च्या सुमारास निघाली होती. पण ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्थानकाजवळ मालगाडीला धडकून ती रुळावरून घसरली.

मालगाडीला धडक दिल्यानंतर ट्रेनचे १७ ते १८ बोगी रुळावरून घसरले, त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

Coromandel Express Accident
AAP : मंत्र्यानेच गायब केल्या फाईल्स? दिल्ली सरकारच्या दक्षता विभागातून कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com