नवऱ्याच्या घरी टॉयलेट नव्हतं; नवविवाहितेने घेतला गळफास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

नवऱ्याच्या घरी टॉयलेट नव्हतं; नवविवाहितेने घेतला गळफास

चेन्नई : तामिळनाडूमधील कुड्डालोर जिल्ह्यात एका नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. नवीन लग्न झालेल्या नवऱ्याच्या घरी टॉयलेट नसल्याच्या कारणावरून तीने गळफास लावत आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Tamilnadu Women Suicide)

रमया असं या मृत महिलेचं नाव असून ६ एप्रिलला तीचा विवाह झाला होता. ती कुड्डालोर जिल्ह्यातील रहिवाशी असून ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. दरम्यान ६ एप्रिलला तीचा कार्तिकेयन या तरुणाशी तीचा विवाह झाला होता. लग्न झाल्यावर तिला आपल्या नवऱ्याच्या घरी टॉयलेट नसल्याचं समजलं आणि ती आपल्या माहेरी आईच्या घरी राहू लागली होती. त्यानंतर तीने आपल्या नवऱ्याला कुड्डालोर शहरात रुम भाड्याने करण्यासाठी सांगितलं होतं.

हेही वाचा: मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला; वसंत मोरेंचं 'एकला चलो रे'

कुड्डालोर शहर हे त्यांच्या घरापासून ४ तासाच्या अंतरावर होतं. रुम भाड्याने करण्याच्या कारणावरुन त्यांची अनेकवेळा बाचाबाची झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी रमयाने राहत्या घरी फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची तीच्या आईने पोलिसांना सांगितलं. तीला उपचारासाठी कुड्डालोर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत. पण उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात तीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे.

आपल्या नवऱ्याच्या घरी काही सोयींची उपलब्धता नसल्याने अनेक नवविवाहित तरुणींनी टोकाचे पाऊल उचलले आहेत. आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती करत असताना भारतातील तामिळनाडूमध्ये टॉयलेट नसल्याच्या कारणावरुन एका महिलेचा बळी गेला आहे.

Web Title: Chennai Newly Married Women Suicide Toilet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimetoilets
go to top