राजकीय पक्ष स्थापण्यास मला भाग पाडू नका: कमल हसन

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

चेन्नई: तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि अभिनेता कमल हसन यांच्यातील शाब्दिक युद्ध आता अधिक तीव्र झाले असून, मला राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी भाग पाडू नका, असा इशारा कमल हसन यांनी आज दिला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कमल हसन यांनी स्पष्ट केले की, आरोग्य विभागाचा प्रमुख हा डॉक्‍टर असावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रमुख हा अभियंता असावा, असे माझे मत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही क्षेत्राचे नेतृत्व हे त्याच क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीने करावे, असे माझे मत आहे.

राजकारणात उतरण्याची इच्छा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना कमल हसन म्हणाले की, एखादा राजकीय पक्ष सुरू करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात पैसा आणि कष्ट आवश्‍यक असतात हे सर्वांना माहिती आहे. मात्र, मला राजकीय पक्ष सुरू करण्यासाठी भाग पाडू नका!

या वक्तव्याप्रकरणी कमल हसन यांना टोला लगावताना तमिळनाडूचे अर्थमंत्री डी. जयकुमार म्हणाले की, कमल हसन अशाच पद्धतीने पुढेही वागत राहिले तर त्यांच्या "मूनराम पिराई' या चित्रपटातील भूमिकेप्रमाणे त्यांची परिस्थिती होईल. जयकुमार आणि कमल हसन यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे.

Web Title: chennai news actor kamal hassan and political party