लष्कराकडून दररोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खातमा: राजनाथसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

चेन्नई: भारत- पाकिस्तान सीमेवर भारतीय जवान सध्या रोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खातमा करत आहेत. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास लष्कराला सांगण्यात आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

चेन्नई: भारत- पाकिस्तान सीमेवर भारतीय जवान सध्या रोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खातमा करत आहेत. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास लष्कराला सांगण्यात आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""पाकिस्तानी सैनिकांवर प्रथम गोळीबार करू नका; पण जर पाकिस्तानने गोळीबार केला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर द्या, असे लष्कराला सांगण्यात आले आहे. भारत आता दुबळा देश राहिलेला नाही. चीनसमवेत डोकलामचा प्रश्‍न भारताने कसा हाताळला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. भारत जर दुबळा देश असता तर चीनबरोबर डोकलामचा प्रश्‍न सोडवूच शकला नसता.''

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पासिंग आउट परेडच्या कार्यक्रमात आज बोलताना ते म्हणाले, ""विरोधी शक्तींना भारताचा वाढता आर्थिक विकास पचत नाही, त्यामुळेच ते भारताची आर्थिक व व्यूहात्मक स्थाने कमजोर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जगातील पहिल्या दहा अर्थव्यवस्थांत भारताचा समावेश आहे. 2030 पर्यंत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांत भारताचा समावेश होणार असल्याचे साऱ्या जगाला पटलेले आहे. सध्या असलेली दोन ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था त्या वेळी पाच ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.''

दहशतवाद हा मोठा धोका असून, अनेक दहशतवादी संघटना देशाचे नुकसान करण्यासाठी संधीची वाट पाहात आहेत असे सांगून ते म्हणाले, ""सीआयएसएफने देशाच्या महत्त्वाच्या कोणत्याही संस्थांवर हल्ला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, सायबर दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीदेखील विशेष विभाग विकसित केला पाहिजे.''

Web Title: chennai news Five to six terrorists killed every day from the army: Rajnath Singh