तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील जोलारपेट्टाई येथून प्रत्येकी 50 हजार लिटर पाणी असलेल्या रेल्वेच्या 50 वाघिणी कोच फॅक्टरीमध्ये पोचल्या. या वाघिणींमधून पाणी काढून ते शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाणार असून, तेथून ते चेन्नईवासीयांना पुरविले जाईल.
चेन्नई : गेल्या काही महिन्यांपासून पाण्यासाठी आसुसलेल्या चेन्नईमध्ये रेल्वेद्वारे 25 लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे. हे पाणी शुद्ध करून ते नागरिकांना वितरित केले जाणार आहे.
तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील जोलारपेट्टाई येथून प्रत्येकी 50 हजार लिटर पाणी असलेल्या रेल्वेच्या 50 वाघिणी कोच फॅक्टरीमध्ये पोचल्या. या वाघिणींमधून पाणी काढून ते शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाणार असून, तेथून ते चेन्नईवासीयांना पुरविले जाईल.
चेन्नईमध्ये मॉन्सूनचा पाऊस चांगला पडत नाही, तोपर्यंत याच माध्यमातून पाणी पुरविले जाणार आहे.