esakal | चेतन भगत, खुशवंतसिंहांची पुस्तकं अश्लिल; रेल्वे स्टेशनवर विक्रीला बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

chetan bhagat khushwant singh books banned at kerala railway station

त्रिचीमधल्या पीएससीचे अध्यक्ष रमेश चंद्र रत्न यांनी रेल्वे स्टेशनवर दोन पुस्तकांच्या विक्रीला मनाई केली आहे. या संदर्भात स्टेशनवरील विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

चेतन भगत, खुशवंतसिंहांची पुस्तकं अश्लिल; रेल्वे स्टेशनवर विक्रीला बंदी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

तिरुचिरापल्ली (केरळ) : रेल्वेच्या पॅसेंजर सर्व्हिस कमिटीने (पीएससी) आता रेल्वेत प्रवाशांना वाचण्यासाठी काय चागलं? काय वाईट? याचा निर्णय घेतलाय. त्रिचीमधल्या कमिटीनं प्रवाशांनी काय वाचावं आणि काय नाही याचा तुघलकी निर्णय घेतलाय. या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्रानं बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या मुस्कटदाबीवर देशभरातून टीका होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं नेमकं?
त्रिचीमधल्या पीएससीचे अध्यक्ष रमेश चंद्र रत्न यांनी रेल्वे स्टेशनवर दोन पुस्तकांच्या विक्रीला मनाई केली आहे. या संदर्भात स्टेशनवरील विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात चेतन भगतच्या हाफ गर्लफ्रेंड या तसेच खुशवंत सिंह यांच्या वुमन, सेक्स लव्ह अँड लस्ट या पुस्तकाचा समावेश आहे. या संदर्भात रमेश म्हणाले, 'वुमन, सेक्स लव्ह अँड लस्ट आणि चेतन भगतचे हाफ गर्लफ्रेंड हे पुस्तक वाचण्याची काही गरज नाही. या पुस्तकांचं कव्हरच आत काय असेल, हे स्पष्ट होते.' या संदर्भात रमेश यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. रेल्वेच्या नियमानुसारच मला, अश्लिल कंटेंट असलेल्या पुस्तकांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अधिकार आहे, असे रमेश यांनी स्पष्ट केलंय. 

आणखी वाचा - 'अध्यक्ष महोदय मी घोटाळा केला नाही'
आणखी वाचा - 'शरद पवारांवर माझा विश्वास, त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल नाही'

काय आहेत ही पुस्तकं?
पद्म विभूषण खुशवंत सिह यांच्या साहित्य संपदेतील वुमन, सेक्स लव्ह अँड लस्ट हे पुस्तक सर्वांत लोकप्रिय आणि त्यांच्या लेखन शैलीतलं उत्तम पुस्तक असल्याचं मानलं जातं. तर, चेतन भगतचे हाफ गर्लफ्रेंड हे पुस्तकही लोकप्रिय पुस्तकांपैकी एक आहे. विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या चेतन भगतच्या या पुस्तकाला विशेष मागणी आहे.