
कोटपुतली येथील बोअरवेलमध्ये अडकलेल्या चेतना (३) या चिमुकलीला दहा दिवसांनंतर १७० फूट खोलीतून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, मुलीचा जीव वाचू शकला नाही. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने बोअरवेलला समांतर बोगदा खोदून मुलीला बाहेर काढले. बचाव पथकांनी बोगद्यातून चेतनाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तांत्रिक बिघाड आणि दिशाभूल झाल्यामुळे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.