समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; शिवप्रेमीतून तीव्र संताप l Bangalore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Shivaji Maharaj Disgrace Bengalur

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची होळी केल्याने भगव्याचा अवमान करण्याचे काम काहींनी कर्नाटकातील काही भागांमध्ये केले.

समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

बेळगाव : सदाशिवनगर बंगळूर (Sadashivnagar,Bengalur)येथे छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. Chhatrapati Shivaji Maharaj Sadashivnagar Bengalur)

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची होळी केल्याने भगव्याचा अवमान करण्याचे काम काहींनी कर्नाटकातील (Karnataka) काही भागांमध्ये केले. लाल-पिवळ्याची होळी केल्याचा बदला घेण्यासाठी पुतळ्यावर काळा रंग ओतल्याचे संदेश पुतळ्याची विटंबना केल्यानंतर समाजकंटकांकडून पाठविण्यात येत आहेत. तसेच रंग ओतण्याचा व्हिडीओही व्हायरल केला आहे.

युवा समितीचे उद्या निवेदन

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची सदाशिवनगर बंगळूर येथे विटंबना करण्यात आली आहे. तसेच चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळण्यात आला. त्याचा निषेध करत समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: जपानमध्ये ओसाका शहरात भीषण आग ; 27 जणांचा मृत्यू?

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांचा अवमान जराही खपवुन घेतला जाणार नाही. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा मराठी माणूस स्वस्थ बसणार नाही.

प्रकाश मरगाळे, खजिनदार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

शिवाजी राजांची कोणीही विटंबना कोणीही करू नये. आज देशात हिंदू टिकून आहे, तो फक्त शिवाजी राजांमुळे याची प्रत्येकाने जाण ठेवणे गरजेचे असून राजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी.

रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष श्री राम सेना हिंदुस्थान