जपानमध्ये ओसाका शहरात भीषण आग ; 27 जणांचा मृत्यू?

आग विझवण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला.
Japan Osaka Fire News
Japan Osaka Fire NewsEsakal

जपानमधील ओसाका (Japan Osaka Fire) शहरात मानसिक आरोग्य उपचार दवाखान्याच्या व्यावसायिक इमारतीत आग लागल्याने २७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओसाका पोलिस (Police) घटनास्थळी पोहचले असून, आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका व्यक्तीने आग लावण्यासाठी रासायनिक द्रव्य सांडले असल्याची माहिती काही जपानी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. (Japan Osaka Fire)

ओसाका हे जपानचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे. राजधानी टोकियोनंतर (Tokyo)ओसाका हे जपानमधील सर्वात मोठे मेट्रो शहर आहे. एका वर्षापूर्वी क्योटो अॅनिमेशन स्टुडिओवर (Kyoto Animation Studio) 2019 च्या जाळपोळीत हल्ल्यात 36 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही एका व्यक्तीवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार मानसिक आरोग्य दखान्याच्या व्यावसायिक इमारतीत ही आग सकाळी १०.३० ला लागली. दुपारपर्यत ७० अग्निशमच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. ही आग विझवण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला.या दुर्घटनेची पोलिस कसून चौकशी करत आहेत. अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

इमारतीच्या चौथ्या मजल्याचे नुकसान

ओसाका अग्निशमन विभागाने एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या चौथ्या मजल्याचे जादा नुकसान झाले आहे. जपानमध्ये केवळ डॉक्टरच अधिकृतपणे एखाद्या व्यक्तीला मृत असल्याचे प्रमाणित करू शकतात.आगीत जखमी झालेल्या 28 पैकी 27 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. असे ही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com