Jyotiraditya Shinde
esakal
अथणी (बेळगाव) : भारतीय इतिहासात शौर्य, धैर्य व स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव अजरामर आहे. त्यांचे आदर्श, प्रशासनाची तत्त्वे व राष्ट्रभक्तीची भावना आजही तरुण पिढीला प्रेरणा देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण म्हणजे केवळ शिल्पाचे उद्घाटन नसून, एका महान युगाच्या स्मृतींना उजाळा देणारा सोहळा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी केले.