छत्तीसगड : ४४ नक्षलींचं सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhattisgarh

छत्तीसगड : ४४ नक्षलींचं सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी नऊ महिला नक्षलवाद्यांसह ४४ नक्षलवाद्यांनी (Naxalite) सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं. जिल्ह्यात सुरू असलेल्या पूना नरकोम (नवीन सकाळ-नवी सुरुवात) मोहिमेत प्रभावित होऊन आणि स्थानिक आदिवासींवरील शोषण, अत्याचार, भेदभाव आणि हिंसाचाराने त्रस्त झालेल्या 44 सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं असं सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी सांगितलं. शर्मा म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्लाटून क्रमांक चारचा सदस्य मडकम दुला (22) याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस आहे.

हेही वाचा: ‘एनडीआरएफ’ निधीमार्फत सहा राज्यांना अर्थसाह्य

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी मिलिशिया सदस्य, संघम सदस्य, चेतना नाट्य मंडळाचे सदस्य आणि समिती सदस्य म्हणून सक्रिय होते. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, आज सुमारे 350 ग्रामस्थ करीगुंडम गावात असलेल्या सुरक्षा दलांच्या छावणीत पोहोचले आणि त्यांनी नक्षलवाद्यांसमोर आत्मसमर्पण केले.

हेही वाचा: Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

जिल्ह्यातील चिंतागुफा, चिंतलनार आणि भेई भागातील विविध नक्षलवादी कारवायांमध्ये नक्षलवादी सहभागी होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितलं. शर्मा म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत मदत आणि इतर सुविधा पुरविल्या जातील.

हेही वाचा: VIDEO: सॅल्युट! इंडियन आर्मीच्या वीर जवांनाचं New Year सेलिब्रेशन बघाच

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Naxalites
loading image
go to top