

Real Ispat Factory Blast
ESakal
छत्तीसगडमधील बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात आज सकाळी एक दुःखद घटना घडली. बाकुलाही (निपानिया) येथील "रिअल इस्पात" स्पंज आयर्न कारखान्यात झालेल्या शक्तिशाली स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी कारखान्यात काम सुरू असताना हा अपघात झाला. अचानक स्पंज आयर्न युनिटमध्ये मोठा स्फोट झाला.