Bijapur Encounter: मोठी बातमी! सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ३ जवान शहीद, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh Encounter News: डीआरजी, स्पेशल टास्क फोर्स आणि सीआरपीएफच्या कोब्रा टीमने संयुक्त मोहीम सुरू केली. सुरक्षा दल जंगलात पुढे सरकताच नक्षलवाद्यांनी एका घातपाती हल्ल्यातून गोळीबार सुरू केला.
Chhattisgarh Encounter

Chhattisgarh Encounter

ESakal

Updated on: 

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद झाले. १२ नक्षलवादीही ठार झाले. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही भीषण चकमक बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरू आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर २ जवानही शहीद झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com