
Summary
६७ वर्षीय प्रियकराने ३० वर्षीय प्रेयसीवर संशय घेत तिची चाकूने हत्या केली.
हल्ल्यादरम्यान ३ वर्षांचा मुलगा आईला वाचवताना गंभीर जखमी झाला.
मृत महिलेचा पती तुरुंगात असून, आरोपी प्रियकर शेतकरी आहे.
छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात एका ६७ वर्षीय प्रियकराने ३७ वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येचे कारण संशय असल्याचे सांगितले जात आहे. वृद्ध प्रियकराला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. म्हणून त्याने संधी मिळताच चाकूने वार करून तिची हत्या केली. या चाकू हल्ल्यादरम्यान महिलेचा तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.