Chhattisgarh Election Result: रमण सिंह छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार? असा आहे राजकीय प्रवास

Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमधील सर्व 90 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप 52 जागांवर तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे.
Chhattisgarh Election Result 2023 who is raman singh who will become cm bjp profile
Chhattisgarh Election Result 2023 who is raman singh who will become cm bjp profile Sakal

Chhattisgarh Election Result 2023: 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आज 4 राज्य छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये मतमोजणी सुरू आहे. यामध्ये केवळ तेलंगणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचे सरकार बनणार आहे अशी शक्यता आहे.

आता छत्तीसगडमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आहे. यावेळीही माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत, छत्तीसगडमधील सर्व 90 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप 52 जागांवर तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत राज्यात भाजपला बहुमत मिळेल, असे म्हणता येईल.

Chhattisgarh Election Result 2023 who is raman singh who will become cm bjp profile
Chhattisgarh Assembly Election 2023 Results LIVE: छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, भाजप बहुमताच्या दिशेने

डॉ. रमण सिंग हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. रमण सिंह यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1952 रोजी रायपूर येथे झाला. त्यांचे वय 71 वर्षे असून ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

त्यांच्या वडिलांचे नाव विघ्नहरन सिंह ठाकूर आणि आईचे नाव सुधा सिंह आहे. रमण सिंह यांच्या पत्नीचे नाव वीणा सिंह आहे. जनसंघाच्या युवा शाखेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

Chhattisgarh Election Result 2023 who is raman singh who will become cm bjp profile
Chhattisgarh Election Result: मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे काय चुकले? काँग्रेसच्या पिछाडीची 'ही' आहेत 10 कारणे

1999 मध्ये त्यांनी देशाचे वाणिज्य राज्यमंत्री म्हणूनही काम केले. 2003 मध्ये ते छत्तीसगडचे दुसरे मुख्यमंत्री बनले. 2008 मध्येही त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राजनांदगावमधून निवडून आले, मात्र भाजपचा पराभव होऊन काँग्रेसची सत्ता आली. 1990 मध्ये रमण सिंह मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1993 मध्ये ते पुन्हा आमदार झाले आणि ते 2004 मध्येही आमदार झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com