Korba woman
esakal
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइलवर रील्स पाहण्याची सवय लागलेल्या ५२ वर्षीय महिलेने इंटरनेट वारंवार बंद पडल्याने त्रासून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी तिने घरात ठेवलेलं कीटकनाशक प्राशन करत आयुष्य संपवलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. मंग्लो बाई सारथी मृतक महिलेचं नाव आहे. त्या केराकछार गावातील रहिवासी होत्या अशी माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.