झाडाला उलटं लटकवून तरुणाला जबर मारहाण, अल्पवयीनासह पाच जणांना अटक

Chhattisgarh
Chhattisgarhesakal
Updated on
Summary

छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय.

छत्तीसगडमधून (Chhattisgarh) एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. येथील बिलासपूर जिल्ह्यात (Bilaspur District) एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झालाय. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीनासह पाच जणांना अटक केलीय.

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, बिलासपूरच्या सिपत पोलीस स्टेशन (Bilaspur Sipat Police Station) हद्दीतील उचाभट्टी गावात तरुणाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय. यानंतर पोलिसांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केलीय. यात मनीष खरे, शिवराज खरे आणि जानू भार्गव यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक केली, तर भीम केसरवाणी आणि एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला रविवारी सकाळी अटक करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितलं की, या घटनेतील पीडित महावीर हा सूर्यवंशी जिल्ह्यातील (Suryavanshi District) रतनपूर भागातील रहिवासी आहे. सिपत परिसरातील उचभट्टी गावात राहून तो मजूर आणि चौकीदार म्हणून काम करतो.

Chhattisgarh
मटण खायला देत नसल्याने मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून

असं समोर आलंय की, 24-25 एप्रिलच्या मध्यरात्री मनीषनं महावीरला घरात घुसण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं. यावेळी महावीर पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी सोमवारी मनीषनं त्याला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पोलिसांच्या हवाली केलं. मनीषनं महावीरविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला नाही, त्यामुळं पोलिसांनी महावीरला इशारा देऊन सोडून दिलं. नंतर मनीषनं महावीरवर आरोप केला की, बुधवारी रात्री महावीर पुन्हा त्याच्या घरी पोहोचला आणि बाहेर पार्क केलेल्या त्याच्या मोटरसायकलचं नुकसान करून पळून गेला. गुरुवारी, मनीष आणि इतर चार आरोपींनी महावीरला पकडलं आणि कथितरित्या त्याला गावातील वीटभट्टीजवळील झाडाला उलटं टांगलं आणि निर्दयपणे मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com