Chhattisgarh Accident :राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चिमुकल्यासह ६ जणांचा मृत्यू

छत्तीसगढच्या बलौदा बाजारात भीषण अपघाताची मोठी दुर्घटना घडली.
Accident News
Accident Newsesakal

छत्तीसगढच्या बलौदा बाजारात भीषण अपघाताची मोठी दुर्घटना घडली. रायपूर-बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.(Latest Marathi News)

Accident News
Cyclone Mocha Update: 'या' राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे ही अपघातीच दुर्घटना घडली. मृतांमध्ये ५ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पिकअपमधील लोक छठीचा कार्यक्रम उरकून परत येत होते.(Latest Marathi News)

त्याचवेळेस जोरदार वेगात आलेल्या ट्रकने पिकअपला धडक दिली. त्या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळीस शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Accident News
Adah Sharma Accident : केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात

दरम्यान, यापूर्वी ३ मे रोजी छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली होती. त्या अपघातात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com