सुकमामध्ये 59 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 59 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे सर्व नक्षलवादी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या संपर्कात असून, आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असताना या सर्व नक्षलवाद्यांनी आज (गुरुवार) आत्मसमर्पण केले. 

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 59 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. हे सर्व नक्षलवादी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या संपर्कात असून, आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असताना या सर्व नक्षलवाद्यांनी आज (गुरुवार) आत्मसमर्पण केले. 

सुकमा जिल्ह्यातील एराबोर येथे या सर्व नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, या सर्व नक्षलवाद्यांनी केलेले आत्मसमर्पण हे सर्वात मोठे आत्मसमर्पण आहे. एराबोर धूर हा नक्षल प्रभावित भाग आहे. या भागात नक्षलवाद्यांकडून अनेकदा नक्षली कारवाया केल्या जातात. मात्र, यातील 59 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यामध्ये 16 महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी गगनपल्ली, मनिकुंटा आणि डब्बाकोंटा या नक्षली भागात सक्रिय होते.

दरम्यान, नक्षलवाद्यांकडून सततत्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा हिंसेचा मार्ग सोडला आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पणादरम्यान पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अभिषेक मीणा उपस्थित होते. 

Web Title: Chhattisgarh Sukma Chhattisgarh 59 naxalites made surrender in sukma together