छत्तीसगडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'हे' आहेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे रमण सिंह हे मुख्यमंत्री आहेत. आता काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाल्यावर छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री पदासाठी काही खास नावेही चर्चेत आहेत.

रायपूर- छत्तीसगडमधल्या निकालानुसार भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस 66 जागांवर पुढे असून, भाजप काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजप केवळ 15 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. 

छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे रमण सिंह हे मुख्यमंत्री आहेत. आता काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाल्यावर छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री पदासाठी काही खास नावेही चर्चेत आहेत.

1) भूपेश बघेल- बघेल हे सध्या छत्तीसगड काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना राज्यात ओबीसींचे नेतृत्व मानले जाते. छत्तीसगडमध्ये ओबीसींची संख्या जवळपास 36 टक्के आहे. विभाजन होण्यापूर्वीच्या मध्यप्रदेशमधील दिग्विजय सिंग सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत.

2) टीएस सिंहदेव- अबिकापूर विधानसभेच्या जागेवरून निवडणुक लडत असलेले टीएस सिंहदेव यांनाही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. 2013 पासून ते छत्तीसगड विधानसभेत विरोधीपक्षनेते आहेत. तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ते मर्जीतले असल्याचेदेखिल सांगण्यात येत आहे. 

3) ताम्रध्वज साहू- साहू हे काँग्रेसच्या ओबीसी विंगचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे केंद्रातील नेत्यांसोबत त्यांचे खास संबंध आहेत. तसेच, 2014 मधील मोदी लाटेच्या विरोधात छत्तीसगडमध्ये एकमेव निवडून आलेले ते उमेदवार होते. 

4) डॉ. चरणदास महंत- महंत, सक्ती या विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लडत आहेत. ते मनमहोन सिंग यांच्या युपीए-2 सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.

Web Title: Chhattisgarh Vidhan Sabha Chunav Result 2018: Who Will Be Cm Bhupesh Baghel Ts Singhdeo Tamradhwaj