Youtubersसाठी हब बनलं 'हे' गाव; ग्रामस्थ जगण्यासाठी करताहेत कंटेन्ट निर्मिती

जगाला डिजिटल विश्वानं जबरदस्त भुरळ घातली आहे. भारतातल्या ग्रामीण भागातील तरुणांना देखील या डिजिटल क्षेत्रानं आता पछाडलंय.
Tlsi Newara
Tlsi Newara

रायपूर : जगाला डिजिटल विश्वानं जबरदस्त भुरळ घातली आहे. भारतातील ग्रामीण भागातील तरुणांना देखील या डिजिटल क्षेत्रानं पछाडलंय. पण हे पछाडणं चांगल्या अर्थानं आहे, कारण प्रातिनिधीक उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास छत्तीसगडमधील तुलसी नामक गाव तर युट्यूबर्सचं हब बनलंय. या गावातील लोक विशेषतः तरुण वर्ग जगण्यासाठी पारंपारिक काम धंदा करण्याऐवजी कन्टेंट निर्मिती करत आहेत. हा व्हिडिओ कन्टेंट सोशल मीडियावर शेअर करत नवं करियर निर्माण केलं आहे. (Chhattisgarh village turns into YouTubers hub locals create content for living)

या गावातील लोकांचे सुमारे ४० युट्यूब चॅनल आहेत. मनोरंजनाशिवाय हे युट्युबर्स शैक्षणिक बाबींवरही व्हिडिओ तयार करत आहेत. गावात हे युट्यूब कल्चर सुरुवातीला दोन मित्रांनी सुरु केलं. ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा ही या मित्रांची नावं आहेत. पण काही दिवसातच त्यांना फॉलो करत संपूर्ण तुलसी गावच या व्यवसायात उतरलं. विशेष म्हणजे Youtube मध्ये करिअर करण्यासाठी शुक्लानं आपला SBIमधील काम तर वर्मानं आपला शिक्षकाचा जॉब सोडला. या दोघांनी मिळून सध्या २५० व्हिडिओ तयार केले असून त्यांच्या चॅनेलला १.१५ लाख सबस्क्रायबर आहेत.

Tlsi Newara
KRK : अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

सुरुवातीला त्यांना हे व्हिडिओ तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कॅमेरॅसमोर येताना लाज वाटणं तसेच सार्वजनिक ठिकाणी अभिनय करताना अवघडल्यासारखं होत असल्याचं या दोघांनी सांगितलं. पण नंतर ही सर्व भीती गळून पडली आणि आता गावातील जवळपास सर्वच लोक आता युट्यूबसाठी व्हिडिओ तयार करत आहेत आणि पैसे कमवत आहेत.

Tlsi Newara
"राज ठाकरे फायटर नेते"; बावनकुळेंकडून कौतुकाचा वर्षाव

जय वर्मा म्हणाला, आम्ही गावातील रामलीलाच्या कार्यक्रमातून बरंच काही शिकलो. आमचं गाव ३००० लोकांचं गाव आहे. यांपैकी ४० टक्के लोक हे युट्यूबशी कनेक्टेड आहेत. युट्यूबवर काम सुरु केल्यानंतर लोक हळूहळू टिकटॉक आणि आता रिल्सवर काम करत आहेत. माझं MSc केमिस्ट्रीपर्यंतच शिक्षण झालं असून मी पार्टटाईम शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यावेळी मला महिन्याला १२,००० ते १५,००० पगार मिळत होता. पण आता ३०,००० ते ३५,००० हजार रुपये महिन्याला मिळत आहेत.

नक्षलग्रस्त भागासाठी युट्यूबद्वारे होतंय महिला सक्षमीकरण

पिंकू साहू या तरुणीनं सांगितलं की, मी दीड वर्षांपासून व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरु केलं आहे. आमचे ४० युट्यूब चॅनेल आहेत. गावातील प्रत्येकजण व्हिडिओमध्ये सहभाग घेतो. आमच्या गावात महिलांना घरातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती पण आता आमच्या युट्यूब चॅनेलमार्फत आम्ही लोकांसाठी चांगल्या प्रकारची माहिती देत आहोत, याद्वारे मुलीपण काहीतरी करु शकतात हे आम्ही दाखवून दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com