Chhattisgarh: ९० वर्षीय सासूच्या पेन्शनसाठी सुनेची पायपीट; सुखमनियानं वाहिलं व्यवस्थेतील त्रुटींचं ओझं

Woman Carries Elderly Mother-in-Law for Pension: छत्तीसगडमध्ये ९० वर्षीय सासूचे रखडलेले पेन्शन मिळवण्यासाठी सुनेला तिला पाठीवर घेऊन तीन किलोमीटर चालावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Chhattisgarh

Chhattisgarh

esakal

Updated on

अंबिकापूर: वृद्धापकाळ, गरिबी आणि व्यवस्थेतील त्रुटी यांचे विदारक चित्र समोर आणणारी एक हृदयद्रावक घटना छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या ९० वर्षांच्या वृद्ध सासूचे रखडलेले ५०० रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी, तिच्या ५० वर्षांच्या सुनेला सासूला पाठीवर घेऊन तीन किलोमीटरची पायपीट करावी लागली. सासूला पाठीवर घेऊन रणरणत्या उन्हात चालणाऱ्या या सुनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com