

CCTV footage shows BJP councillor Lokesh Dehariya collapsing
esakal
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नगरसेवकाचा भर रस्त्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरसेवक लोकेश देहरिया यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात ते रस्त्यावरून चालत असताना अचानक कोसळताना दिसत आहेत.