शिकागोत विमानाला आग; 170 प्रवासी बचावले

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

शिकागो - शिकागोतील ओहेर विमानतळावर अमेरिकन एअरलाईन्सच्या जेट विमानाला लागलेल्या भीषण आगातून 170 प्रवासी थोडक्यात बचावले. 

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी हे जेट विमान विमानतळावरच उतरताच आग लागली. विमानाच्या मागील भागास आग लागल्याचे समजताच विमानातील सर्व 170 प्रवाशांना तात्काळ उतरविण्यात आली. या आगीत आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मियामीहून हे विमान शिकागोला पोहचले होते. इंजिनातील बिघाडामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

विमानातील प्रवासी सराह अहमद यांनी सांगितले की, विमानाच्या इंजिनमध्ये मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्याने ते जखमी झाले. 

Web Title: Chicago: 8 injured as American Airlines flight catches fire on runway

टॅग्स