esakal | वडिलांचं ब्राह्मण विरोधी वक्तव्य; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा कारवाईचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Bhupesh Baghel

वडिलांचं ब्राह्मण विरोधी वक्तव्य; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा कारवाईचा इशारा

sakal_logo
By
सुधीर काकडे

छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल (Nandkumar Baghel) यांनी ब्राम्हण समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नंदकुमार बघेल यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री भुपेश बघेल हे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणावर बोलताना, नंदकुमार बघेल यांनी चुक केली असेल, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

'सर्व ब्राम्हण समाज' या संघटनेने आज मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. 'ब्राम्हण हे परदेशी असून त्यांच्यावर बहिष्कार टाका, त्यांना गावात येऊ देऊ नका' असे वक्तव्य नंदकुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आवश्यकता भासल्यास नंदकूमार बघेल यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल अशी प्रतिक्रीया दिली आहे. नंदकुमार बघेल यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भूपेश बघेल म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर वेगवेगळ्या समाजांमध्ये सुसंवाद राखण्याची जबाबदारी आहे. जर नंदकुमार बघेल यांनी एखाद्या समुदायाविरुद्ध टिप्पणी केली असेल तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो."

हेही वाचा: आंदोलनस्थळी आमचं थडगं बांधलं तरी मागे हाटणार नाही - राकेश टिकैत

संघटनेने असेही सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या कथित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार बघेल यांनी उत्तर प्रदेशामधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे.

loading image
go to top